नवी मुंबई / अनंतकुमार गवई
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जंयती उत्सव सोहळा नेरूळ सेक्टर सहा परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला. सेक्टर सहामधील भाजी मार्केट मैदानात हनुमान मंदिर परिसरात या सोहळ्याचे आयोजन पंचशील सामाजिक संस्थेकडून करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126व्या जंयतीनिमित्त आयोजित या उत्सवामध्ये प्रभाग 86च्या नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्जवलन करण्यात आले. प्रभाग 86च्या नगरसेविका सौ. जयश्री एकनाथ ठाकूर यांच्या हस्ते भगवान गौतम बुध्दांच्या प्रतिमेस पुष्पहार तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सुरज बाळाराम पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमास सुरूवात झाली.
यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून नगरसेवक सुरज पाटील यांनी आपल्या छोटेखानी भाषणातून बाबासाहेबांच्या जीवनपटाचा आढावा घेत त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेत सर्वांनी त्यावर वाटचाल करावी असे सांगितले.
सांयकाळी नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गाव परिसरातून रॅली काढण्यात आली. या कार्यक्रमात ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री लोकनेते गणेश नाईक, भीमराव तायडे, तुकाराम टाव्हरे, महादेव पवार, यशवंत तांडेल, पत्रकार योगेश शेटे, अशोक आतकरी, मनिषा लगाडे, संजीवनी कुंभारकर, संजय चौधरी, रमेश म्हस्के, निलेश दौंडकर यांच्यासह स्थानिक रहीवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा जंयतीसोहळा यशस्वी करण्यासाठी पंचशील सामाजिक संस्थेचे संघठक व प्रमुख सल्लागार विरेंद्र लगाडे, गोविंद सपकाळे, कैलास काटेे, ज्ञानेश्वर खरात, ज्ञानाबाई निकम, पदिनी रणदिवे, सुरेश हिंगोले, रविंद्र डोंगरे आदींनी परिश्रम घेतले.