नवी मुंबई / सुजित शिंदे
भारताचे सुपुत्र कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने अटक करून मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्याच्या निषेधार्थ आज नवी मुंबई मनसेकडून शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली भव्य बाईक रॅली काढण्यात आली.
बाईक रॅलीच्या अगदी सुरुवातीला भारताचा तिरंगी झेंडा घेऊन भारतमाता की जय !!!, वंदे मातरम !!!, कुलभूषण जाधव यांची सुटका झालीच पाहिजे !!!!, पाकिस्तान मुर्दाबाद !!!! अशा घोषणा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी नवी मुंबई परिसर दणाणून सोडला, ही बाईक रॅली जुईनगर गणेश मैदान ते वाशी बस डेपो, छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत काढण्यात आली होती. नंतर या बाईक रॅलीचे रुपांतर वाशी चौक येथे निदर्शनांमध्ये झाले. यावेळी मनसे शहर सचिव संदीप गलुगडे, उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले, विनोद पार्टे, रवींद्र वालावलकर, डॉ.आरती धुमाळ, अनिथा नायडू, प्रिया गोळे यांची पाकिस्तानच्या निषेधार्थ भाषणे झाली. ५६ इंचांची छाती करत मिरवणाऱ्या राज्यकर्त्यांनी भारताचे सुपुत्र कुलभूषण जाधव यांना परत आणा असे म्हणत शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी पाकिस्तानच्या या कृतीचा निषेध केला.
या सर्व बाईक रॅली मध्ये मनसेची विद्यार्थी सेना, महिला सेना, रोजगार विभाग, चित्रपट सेना, जनहित कक्ष च्या सर्व कार्यकर्त्यांबरोबरच सविनय म्हात्रे, नितीन चव्हाण, श्रीकांत माने, चंद्रकांत महाडिक, संदेश डोंगरे, सनप्रीत तुर्मेकर, आप्पासाहेब कोठूळे, स्वप्नील गाडगे, निखील गावडे, तुषार कचरे, भालचंद्र माने, विभाग अध्यक्ष सचिन कदम, विनय कांबळे,विक्रांत मालुसरे, अभिजित देसाई, भगवान म्हसुरकर, प्रवीण वाघमारे यांचा सहभाग होता.
कुलभूषण जाधव यांची सुटका झालीच पाहिजे, कुलभूषण जाधव यांना परत आणा या संदर्भात येत्या दोन तीन दिवसात मनसे नवी मुंबई कडून कोकण विभागीय आयुक्त यांना निवेदन देणार असल्याचे मनसेचे शहर सचिव संदीप गलुगडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.