महाराष्ट्रदिनी वाशीत न्युजलेस कविता, पत्रकार कवींची काव्य मैफल
साईनाथ भोईर
नवी मुंबई : 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने नवी मुंबई कला प्रतिष्ठान व जनविकास प्रबोधिनी या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून बातमीच्या जगातून कवितेच्या गावात घेऊन जाणारी, पत्रकार कवींची गाजलेली काव्य मैफल न्युजलेस कविता याचे आयोजन वाशी दैवज्ञ भवन हॉल सेक्टर-9अ येथे सायंकाळी 6 वाजता केल्याचे संस्थेचे अध्यक्ष गजानन काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
या न्युजलेस कविता काव्य मैफिलीत पंकज दळवी (महाराष्ट्र-1 प्रिन्सिपल कॉरेसपॉन्डेंत), भीमराव गवळी (पत्रकार, म.टा. ऑनलाईन), सुरेश ठमके (संपादक, माय मराठी न्यूज चॅनेल), ह.भ.प. श्यामसुंदर सोन्नर (राजकीय प्रमुख, दै. प्रहार), रचना विचारे (अँकर, महाराष्ट्र-1), प्रशांत डिंगणकर (मुक्त पत्रकार) हे पत्रकार कवी आपल्या कविता, गजल सादर करणार आहेत. आतापर्यंत या न्युजलेस कवितेच्या पंचवीस ते तीस काव्य मैफिली महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात झाल्या असून काव्य रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्याची माहिती ही गजानन काळे यांनी दिली आहे.
या काव्य मैफिलीत नवी मुंबईतील पत्रकार कवींनाही आपल्या कविता सादर करण्याची संधी मिळणार आहे. तरी या कार्यक्रमास मोफत प्रवेश असून नवी मुंबईतील काव्य रसिकांनी या काव्य मैफिलीचा आनंद घेण्यासाठी जरूर उपस्थित रहावे असे आवाहन नवी मुंबई कला प्रतिष्ठान व जनविकास प्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष गजानन काळे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क – 9664278717, 7666181555, 9664848007 या क्रमाकांवर संपर्क साधण्याचे आवाहन गजानन काळे यांनी केले आहे.