आमदार निरंजन डावखरे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
ही पॅसेंजर गाडी कोकण रेल्वेच्या सर्व स्थानकांवर थांबत असल्याने तसेच तिकीट देखील किफायतशीर असल्याने बाराही महिने ही गाडी प्रवाशांनी खच्चून भरलेली असते. मात्र गेले काही दिवस ही गाडी दादर स्थानकाहून न सुटता मध्य रेल्वेवरील दिवा स्थानकातून सुटते. परतीच्या प्रवासात देखील ही गाडी दादरला न पोचता दिवा येथेच संपवली जाते. त्याचा मोठा त्रास प्रवाशाना होत आहे. हातातील सामानासह, बायकामुलांसह प्रवाशाना गर्दीच्या वेळी स्लो लोकल पकडून दिवा येथे धावाधाव करावी लागते. यात प्रवाशांच्या वेळेचा देखील अपव्यय होतो. प्रवाशांचा त्रास वाचावा यासाठी ही पॅसेंजर ट्रेन दादरहूनच सोडावी तसेच दादरपर्यंतच आणावी अशी विनंती आमदार निरंजन डावखरे यानी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे.