नवी मुंबई : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज अवलोकन करण्यासाठी नुकतीच सार्वत्रिक निवडणूक पार पडलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी नवी मुंबई महापालिका मुख्यालयास भेट देऊन प्रेक्षक गॅलरीतून जुलै महिन्याच्या महासभेचे कामकाज पाहिले.
यावेळी महापौर सुधाकर सोनवणे यांनी पनवेल महानगरपालिकेच्या प्रितम म्हात्रे, अरविंद म्हात्रे, बबन मुकादम, रविंद्र भगत, प्रमोद भगत, विजय खानावकर, गुरूनाथ गायकर, विष्णू जोशी, डॉ. सुरेखा मोहोकर, शितल केणी, भारती चौधरी, जयश्री म्हात्रे, प्रिया भोईर, उज्वला पाटील, अरूणा दाभणे, सारिका भगत, श्रीम. प्रिती जॉर्ज, शिला भगत, कमल कदम, चंद्रकला शेळके, हेमलता गोवारी अशा 21 नगरसेवकांचे महापौर दालनात पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेचे सभागृहनेते जयवंत सुतार, भारतीय जनता पक्ष प्रतोद रामचंद्र घरत, माजी महापौर सागर नाईक, नगरसेवक शिवराम पाटील, अनंत सुतार, सुरेश कुलकर्णी, रविंद्र इथापे, सुरज पाटील, गिरीश म्हात्रे आदी उपस्थित होते.