स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
ठाणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ, सबका विकास या संकल्पनेवर विश्वास ठेवत उत्तनचे माजी नगरसेवक फ्रान्सिस बोर्जिस, हेरल केर्जीर्स, जेम्स कोर्लसो आणि माजी परिवहन सभापती रेनॉल्ड बेचरी यांच्यासह उत्तन परिसरातील काही सामाजिक कार्यकर्ते तसेच प्रतिष्ठीत नागरिक आणि शेकडो कार्यकर्ते यांनी आमदार नरेंद्र मेहता यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेशकेला. यावेळी आमदार मेहता यांनी उत्तनकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे आश्वासन दिले.
उत्तन येथील प्रभाग क्रमांक 23 येथील जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन आ. नरेंद्र मेहता यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित सभेत हा प्रवेश सोहळा पार पडला. आ. नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, कोणत्याही अटीशर्तींशिवाय भाजपात प्रवेश करत असल्याची भावना यापैकी प्रत्येकाने व्यक्त केली. उत्तनचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय असून, भाजप हाच एकमेव पक्ष आपल्याला न्याय देऊ शकेल, असा विश्वास वाटल्याने आम्ही सर्वांनी हा निर्णय घेतल्याचे फ्रान्सिस बोर्जिस,हेरल केर्जीर्स, जेम्स कोर्लसो आणि रेनॉल्ड बेचरी यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कधीही धर्म, जात किंवा प्रांतवादाला थारा न देता कायमच विकासाचे राजकारण केले. त्यांची ही भुमिका भावल्यानेच आम्ही सर्वजण त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले. या सर्वांचे पक्षात स्वागत करत आ. नरेंद्र मेहतांनी उत्तन परिसराच्या विकासासाठी एकदिलाने काम करण्याची ग्वाही दिली.