स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर चलनात आणलेल्या २००० रुपयांच्या नोटांची छपाई रिझर्व्ह बँकेकडून बंद करण्यात आली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून या नोटांची छपाई केली जात नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. तसेच २०० रुपयांची नवी नोट लवकरच चलनात आणण्यात येणार आहे. पुढील महिन्यात ती चलनात येईल, असे सांगितले जाते. या नोटांची छपाई वेगाने सुरू आहे.
२००० रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्याचे आदेश सरकारने दिले होते. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने पाच महिन्यांपूर्वीच या नोटांची छपाई बंद केली आहे, अशी माहिती सूत्रांकड़ून देण्यात आली आहे. तर २०० रुपयांची नवी नोट पुढील महिन्यात चलनात आणली जाणार आहे. नोटांची छपाई वेगाने सुरू आहे, अशी माहितीही आरबीआयच्या सूत्रांनी दिली. नोटाबंदीनंतर आरबीआयने ७.४ लाख कोटी रुपये मूल्याच्या ३.७ अब्ज २००० रुपयांच्या नोटा चलनात आणल्या होत्या. नोटाबंदीनंतर १००० रुपयांच्या ६.३ अब्ज नोटा चलनातून बाद झाल्या होत्या, अशी माहिती आरबीआयच्या सूत्रांकडून देण्यात आली. चलनपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी आरबीआयने जूनमध्येच २०० रुपयांच्या नोटांची छपाई सुरू केली होती, अशी माहितीही समोर आली आहे.