भाजपा प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवार यांचा गुणवंत विद्यार्थी सोहळ्यात विद्यार्थ्यांना मौलिक सल्ला
कल्याण : जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम घ्या, विद्यार्थ्यानी निश्यित ध्येय डोळ्यासमोर ठेवले, तर त्यांना उच्च शिखर गाठण्यास कोणीही रोखू शकत नाही. त्यासाठी ध्येयवादी व्हा आणि आपले वर्तमान कर्तुत्व भारतमातेच्या चरणी समर्पित करा असा मौलिक सल्ला भाजपा प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवार यांनी विद्यार्थ्यांना दिला. यावर्षी देखील गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन तीन टप्प्यात शनिवार आणि रविवारी आमदार नरेंद्र पवार यांच्या माद्यमातुन कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघात करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी उपस्थितीत सत्कारमुर्ती विद्यार्थी आणि त्यांच्या पालकाशी
संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी संवाद साधत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
भारतीय जनता पार्टी कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्राच्या माध्यमातून भाजपाचे प्रदेश सचिव तथा आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने कल्याण शहरातील दहावी व बारावी परीक्षेत यशस्वी कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा गुणगौरव सोहळा मोहने येथील एनआरसी सभागृह, कल्याण येथील आधारवाड़ी चौक येथील मंगलकलश सभागृह व चिकणघर येथील मंगेशी सभागृह या विविध सभागृहात विविध प्रमुख मान्यवारांच्या उपस्थित पार पडला. याप्रसंगी मोहने येथे सुमारे ८०, आधारवाडी व चिकणघर परिसरातील सुमारे ५०० असे एकुण ५८० विद्यार्थ्यांचा व् पालकांचा गौरव करण्यात आला. यावेळी आमदार नरेंद्र पवार यानी आयोजित केलेल्या उपक्रमाची माहिती देत उपस्थित असलेल्या मान्यवारंचे आभार मानले व सर्व विद्यार्थी – पालकांना शुभेच्या दिल्या.
दरम्यान यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिक भाजपा गटनेते वरुण पाटील, महिला बालकल्याण समिती सभापती वैशाली पाटिल, स्थायी समिती सदस्य अर्जुन भोईर, माजी शिक्षण मंडळ सभापती दयाशेठ गायकवाड, नगरसेविका उपेक्षा भोईर, जिल्हा सरचिटणीस शिवाजी आव्हाड ,शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे ,युवा मोर्चाचे प्रदेश सचिव निखिल चव्हाण, भाजपा ठाणे विभाग सरचिटणीस राजाभाऊ पातकर, देवानंद भोईर, भाजपा ज्येष्ठ पदाधिकारी निरजा मिश्रा, भाजपा युवा मोर्चा कल्याण जिल्हा सरचिटणीस सदानंद कोकणे,भाजपा कल्याण शहर सरचिटणीस रितेश फडके, परिवहन सदस्य कल्पेश जोशी, मोहने मंडळ अध्यक्ष सुभाष पाटील, ठाणे विभाग उपाध्यक्षा साधनाताई गायकर, भाजपा कार्यकर्ते रवि गायकर, डॉ. सुभाषचंद्र पाटील, डॉ. आनंत इटकर, उप प्राचार्य महेंद्र रजपूत, हरबिरसिंग हायर आदि मान्यवरांसह परिक्षेत्रातिल असंख्य भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.