गणेशोत्सवानिमित्त तयारीचा मुख्यमंत्री देवेंद्र फ
मुंबई – राज्यातील गणेशोत्सव हा पारंपरिक उत्सव असल्यामुळे तो शांततेत व उत्साहात पार पडावा, यासाठी पोलीस विभागाने संवदेनशील राहून सुरक्षेचे उपाय योजावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. तसेच गणेशोत्सव मंडळांना सर्व परवाने ऑनलाईन देण्यासंदर्भात राज्यातील सर्व आयुक्तालयांनी कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. पारंपरिक गणेशोत्सवाच्या तयारीचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज आढावा घेतला. यावेळी मुंबईचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिक्षण मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री (ग्रामीण
गणेश स्थापना तसेच विसर्जन काळात योग्य त्या उपाय योजना राबविण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना यावेळी दिले. तसेच या काळात राज्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सुरक्षेचे उपाय योजण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. या काळात नियमांचे पालन करून गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्याच्या सूचना पोलीसांनी गणेश मंडळांना द्याव्यात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुंबईमधील गणेश मूर्तींच्या उंचीसंदर्भात गणेश मंडळांनी व समन्वय समितीने जनजागृती करावी. तसेच मुंबईतील वाहतूक कोंडी व नागरिकांची गैरसोय टाळावी, यासाठी स्थापनेसाठी गणेशमूर्ती सुट्टीच्या दिवशी आणावी, अशा सूचना पोलीसांनी सर्व सार्वजनिक गणेशमंडळांना द्याव्यात, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
मुंबईत सध्या मेट्रोची कामे सुरू आहेत. यामुळे वाहतूक पोलीस विभागाने गर्दीचे व्यवस्थापन योग्यरितीने करावे. तसेच मंडळांना लागणारे सर्व परवाने ऑनलाईन देण्यासंदर्भात सर्व आयुक्तालयांनी कार्यवाही करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. यावेळी पोलीस महासंचालक श्री. माथूर यांनी पोलीस विभागामार्फत करण्यात आलेल्या उपाय योजनांची माहिती दिली.