भल्या पहाटे ‘मॉर्निंग वॉक’ करणाऱ्यांशी संवाद साधत मा.आमदार नरेंद्र मेहता यांनी केला प्रचार
मीरा भाईंदर : मीरा भाईंदर महापालिकेचा प्रचार ऐन भरात आलेला असतानाच, भाजपाच्या उमेदवारांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भाजपाच्या सर्वच उमेदवारांनी भर दिला असून सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या मतदारांना भेटून, भाजपाने केलेली विकासकामे आणि मतदारांना भेडसावत असलेल्या समस्यांबाबत चर्चा केली जाणार आहे. मंगळवार दिनांक ८ आॅगस्ट पासून या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली असून मीरारोड पुर्वेच्या पुनम सागरच्या मागे असलेल्या जाॅगर्स पार्कमध्ये सकाळी सात वाजल्यापासून खुद्द आमदार नरेंद्र मेहता यांनी मतदारांशी संवाद साधला.
मीरा भाईंदर शहराचा विकास करताना नागरिकांची मते विचारात घेण्याचे धोरण भाजपाने सुरूवातीपासूनच अवलंबले आहे. याच भुमिकेतून निवडणूक घोषित होताच भाजपाने “मेरा शहर, मेरा सुझाव’ हा उपक्रम रावबिला होता. या उपक्रमाद्वारे मतदारांनी केलेल्या सुचनांचा विचार भाजपाच्या निवडणूक जाहीरमान्यात तसेच भविष्यात महापालिकेतील सत्ता राबविताना केला जाणार आहे. आता प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यातही भाजपाने नागरिकांची थेट मते जाणून घेण्यासाठी त्यांच्या प्रत्यक्ष भेटीगाठींवर भर दिला आहे. घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधतानाच, अनेक प्रभागातील भाजपाचे उमेदवार भल्या पहाटेपासूनच मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडून नागरिकांच्या गाठीभेटी घेणार आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ मंगळवारपासून करण्यात आला. मंगळवारी सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेले ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी यांचे मा. मेहतांनी जाॅगर्स पार्कमध्ये स्वागत केले. अनेकांनी यावेळी आ. नरेंद्र मेहता यांना महापालिका निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. भाजपच्या “मेरा शहर, मेरा सुझाव’ या उपक्रमाचेही अनेकांनी यावेळी कौतुक केले. शहर विकासाच्या विविध प्रश्नांवरही यावेळी मेहता व नागरिकांची जुजबी चर्चा झाली. आगामी काळात आपले शहर सुनियोजित करण्यासाठी भाजपच्या पाठीशी भक्कमपणाने उभे रहा, असे आवाहनही मेहता यांनी यावेळी नागरिकांना केले.
प्रचार मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यात थेट उमेदवारांशी संवाद साधत आपल्या समस्या आणि सुचनांवर चर्चा करण्याची संधी या उपक्रमाद्वारे मतदारांना मिळणार आहे. तसेच या संवादादरम्यान भाजपाचे स्थानिक नेतृत्व आ. नरेंद्र मेहता यांच्या शहराच्या विकासाबद्दलच्या नेमक्या काय संकल्पना आहेत, भाजपद्वारे शहराच्या विकासासाठी नेमके काय प्रयत्न केले जात आहेत, या विषयीची माहितीही मतदारांना उमेदवारांकडून दिली जाणार आहे. भाजपाच्या या स्मार्ट प्रचाराच्या नियोजनामुळे इतर पक्ष मात्र भांबावून गेले आहेत.