दिपक देशमुख
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका प्रशासनात काम करणार्या कनिष्ठ अभियंत्यांना पाच वर्षानंतरही प्रशासनाकडून पदोन्नती देण्यात आला नाही. पदोन्नतीबाबत प्रशासनाचा ढिसाळ कारभार सुरू असतानाच संबंधित कनिष्ठ अभियंत्यांना तातडीने पदोन्नती देण्याची लेखी मागणी इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी एका निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या स्थापनेपासून प्रशासन विभागात सावळागोंधळ सुरू आहे. कोणाला पदोन्नती देणे अथवा डावलणे याबाबत शासकीय निकषाची कधीही अंमलबजावणी होत नसून बढतीबाबतचे सर्व संकेत मनमानी कारभारामुळे पायदळी तुडविले जात आहे. महापालिका प्रशासनामध्ये कनिष्ठ अभियंता या पदावर असंख्य गुणवंत कर्मचारी कार्यरत आहेत. वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे परिश्रम करूनही या कनिष्ठ अभियंत्यांना पदोन्नती (दरजोणोती) दिली जात नाही. नियमानुसार 5 वर्षानी पदोन्नती (दरजोणोती) देणे आवश्यक असताना पदोन्नती दिली जात नाही. पदोन्नती आपल्यावर पदोन्नतीबाबत (दरजोणोती) होत असलेल्या अन्यायाविषयी संबंधित कनिष्ठ अभियंत्यांनी तक्रारी संबंधित कर्मचार्यांनी आमच्याकडे केल्या असल्याचे रवींद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
आम्ही या प्रकाराची शहनिशा केल्यास या प्रकरणात सत्यता आढळली असून वर्षानुवर्षे काम करूनही प्रशासनाने कनिष्ठ अभियंत्यांना पदोन्नती (दरजोणोती) दिली नसल्याचे निदर्शनास आले आहे. एका प्रगत शहराचे प्रतिनिधीत्व करणार्या महापालिका प्रशासनाला ही बाब नक्कीच भूषणावह नाही. ही पदोन्नतीची समस्या केवळ कनिष्ठ अभियंता यापुरतीच सिमित नसून अन्य प्रकारात काम करणार्या कर्मचारी व अधिकार्यांच्या बाबतीतही पहावयास मिळते. आपण याप्रकरणी महापालिकेतील संबंधित विभागाकडे चौकशी करून अहवाल मागवावा. आणि पदोन्नतीबाबत अन्याय झालेल्या कर्मचारी व अधिकार्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी रवींद्र सावंत यांनी केली आहे.