नवी मुंबई : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्षाचे उप आयुक्त तुषार पवार, परिमंडळ-1 चे उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार व परिमंडळ-2 उप आयुक्त अंबरीश पटनिगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत मिशन अंतर्गत “संकल्प से सिध्दी” या स्वच्छता उपक्रमांतर्गत 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत विविध स्वच्छता विषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
14 ऑगस्ट रोजी ऐरोली कार्यक्षेत्रामधील स्वच्छ भारत मिशन (MoUD) यांच्या कडून प्राप्त झालेल्या सुचनेनुसार कच-याचे वर्गीकरण हे कचरा निर्मीतीच्या ठिकाणीच करण्याच्या दृष्टीने ओला कचऱ्यातील घटक हिरव्या कचरा कुंडीत व सुक्या कचऱ्यातील घटक निळ्या कचरा कुंडीत टाकणे या विषयी ‘Waste Segregation teaching aid’ नुसार सर्व महानगरपालिकेच्या साफसफाई कामगारांना मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे बचतगटांसाठी टाकाऊ पासुन टीकाऊ या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष मोहिमेमध्ये नगरसेवक संजु वाडे, ऐरोली विभागाच्या सहा. आयुक्त संध्या अंबादे, स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे, स्वच्छता निरिक्षक नितीन महाले, सम्राट कांबळे, उप स्वच्छता निरिक्षक विशाळ खारकर, गणेश राऊत, विजय दुर्लेकर, भुषण पाटील, दिपक शिंदे, मिलींद दौडा,स्वच्छाग्रही व स्थानिक रहिवाशी सहभागी झाले होते.
15 ऑगस्ट रोजी वाशी कार्यक्षेत्रामधील सेक्टर- 9 येथील भाजी मंडईमध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली व कच-याचे वर्गीकरण हे कचरा निर्माण होणा-या ठिकाणीच करून ओला कचरा हिरव्या कचरा कुंडीत व सुका कचरा निळ्या कचरा कुंडीत टाकणे, तसेच कच-यावर सेंद्रिय अथवा जैविक पध्दतीने प्रक्रिया करणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सागर विहार येथे खाडी व वाशी हायवे परिसराची विशेष साफसफाई करण्यात आली. वाशी स्टेशन येथील शौचालयाची किरकोळ दुरुस्ती करुन साफसफाई करण्यात आली. या मोहिमेमध्ये नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.27 मधील शाळेय विद्यार्थ्यांची स्वच्छतेबाबत निबंध स्पर्धा घेण्यात आली. स्वच्छ भारत मिशन (MoUD) यांच्या कडून प्राप्त झालेल्या सुचनेनुसार कच-याचे वर्गीकरण हे कचरा निर्मीतीच्या ठिकाणीच करण्याच्या दृष्टीने ओला कचऱ्यातील घटक हिरव्या कचरा कुंडीत व सुक्या कचऱ्यातील घटक निळ्या कचरा कुंडीत टाकणे या विषयी ‘Waste Segregation teaching aid’ नुसार सर्व महानगरपालिकेच्या साफसफाई कामगारांना मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमावेळी वाशी विभागामधील विभाग अधिकारी महेंद्र ठोके, स्वच्छता अधिकारी विनायक जुईकर, शाळेचे मुख्याध्यापक, स्वच्छता निरीक्षक जयश्री आढाळ, सरकटे, तांडेल, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, स्वच्छाग्रही व स्थानिक रहिवाशी सहभागी झाले होते.
15 ऑगस्ट रोजी बेलापुर कार्यक्षेत्रामधील सेक्टर- 3 येथील भाजी मंडईमध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली व कच-याचे वर्गीकरण हे कचरा निर्माण होणा-या ठिकाणीच करून ओला कचरा हिरव्या कचरा कुंडीत व सुका कचरा निळ्या कचरा कुंडीत टाकणे, तसेच कच-यावर सेंद्रिय अथवा जैविक पध्दतीने प्रक्रिया करणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. दारावे येथील तलाव, तलाव परिसराची विशेष साफसफाई करण्यात आली. या मोहिमेमध्ये नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.22 मधील शाळेय विद्यार्थ्यांची स्वच्छतेबाबत निबंध स्पर्धा घेण्यात आली. स्वच्छ भारत मिशन (MoUD) यांच्या कडून प्राप्त झालेल्या सुचनेनुसार कच-याचे वर्गीकरण हे कचरा निर्मीतीच्या ठिकाणीच करण्याच्या दृष्टीने ओला कचऱ्यातील घटक हिरव्या कचरा कुंडीत व सुक्या कचऱ्यातील घटक निळ्या कचरा कुंडीत टाकणे या विषयी ‘Waste Segregation teaching aid’ नुसार सर्व महानगरपालिकेच्या साफसफाई कामगारांना मार्गदर्शन करण्यात आले. सदर मोहिमेमध्ये बेलापूर विभागाच्या सहा. आयुक्त प्रियंका काळसेकर, स्वच्छता निरीक्षक कवीता खरात, उप स्वच्छता निरीक्षक मिलींद तांडेल, उप स्वच्छता निरीक्षक रवींद्र चव्हाण, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, स्वच्छताग्रही व नागरीक सहभागी झाले होते.