स्वयंम न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
नवी मुंबई : नवी मुंबईत सध्या साथीच्या आजारांनी थैमान घातले असतानाच वाशीतील भाजपच्या नगरसेविका सौ. दमयंती संपत शेवाळे या चर्चेच्या विषय ठरल्या आहेत. प्रभागातील नागरिकांना साथीचे आजार होवू नये म्हणून नगरसेविका सौ. दमयंती संपत शेवाळे यांनी स्वखर्चाने परिसरात धुरफवारणी सुरू करून डासांच्या उद्रेकापासून रहीवाशांना मुक्त करण्याचे कार्य हाती घेतले आहे. विशेष म्हणजे रहीवाशांना होत असलेल्या त्रासाविषयीची माहिती जाणून घेण्याकरिता नगरसेविका सौ. दमयंती संपत शेवाळे यांनी सुरू केलेल्या हेल्पलाईनचीही नवी मुंबईतील युवा वर्गात, सुशिक्षितांमध्ये चर्चा होवू लागली आहे.
महिलांचा राजकारणात सहभाग का आणि कशाकरता आवश्यक आहे, हे भाजपा नगरसेविका सौ. दमयंती संपत शेवाळे यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. प्रभाग 63 मध्ये वाशी सेक्टर 17 आणि वाशी सेक्टर 1 व 2 या परिसराचा समावेश होत आहे. दरवर्षी पावसाळ्यात ताप, हिवताप, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस आदीस साथीचे आजार नवी मुंबईत मोठ्या प्रमाणावर पसरतात. पावसाळ्यात डासांची घनता वाढीस लागत असल्याने साथीचे आजार फैलावण्यास मदत होते. महापालिका प्रशासनाकडून गृहनिर्माण सोसायट्यांकडून धुरीकरण होत नाही.डेंग्यूचा रूग्ण आढळल्यावर घरोघरी जावून औषध फवारण्याची तत्परता नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून दाखविली जाते.
या पार्श्वभूमीवर आपल्या प्रभागातील नागरिकांचे डासांपासून पर्यायाने साथीच्या आजारापासून संरक्षण करण्यासाठी नगरसेविका सौ. दमयंती संपत शेवाळे यांनी 7 ऑगस्टपासून स्वखर्चाने प्रभागात धुरीकरण मोहीम सुरू केली आहे. वाशी सेक्टर 1 व 2 परिसरात दर शनिवारी आणि वाशी सेक्टर 17 परिसरात दर बुधवारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात नगरसेविका सौ. दमयंती शेवाळेंकडून धुरीकरण मोहीम राबविली जात आहे. नगरसेवक विकासकामे करतात केवळ कमिशन मिळविण्यासाठीच असा नवी मुंबईकरांचा समज असतानाच या पार्श्वभूमीवर स्वखर्चाने परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये स्वखर्चाने धुरीकरण करणार्या नगरसेविका सौ. दमयंती शेवाळे यांची कामगिरी नवी मुंबईकरांमध्ये लक्षवेधी ठरली आहे.