मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत 14 सप्टेंबर रोजी अमेरिकेच्या अभ्यास दौ-यावर प्रस्थान करणार आहेत. अमेरिका सरकारने आयोजित केलेल्या 21 दिवसांच्या या अभ्यास दौ-यात देशभरातील विविध राजकीय पक्षांचे 9 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. राजकारण आणि नागरी चळवळीतील युवकांचा सहभाग या प्रकल्पांतर्गत अमेरिकेच्या राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेचा अभ्यास, भारताच्या राजकीय आणि समाजिक कार्यपध्दतीबाबत विचारांचे आदान प्रदान या अभ्यास दौ-यात होणार आहे. या अगोदर सदर प्रकल्पांर्गत देशातील अनेक नामवंत राजकीय नेत्यांना अमेरिका सरकारने आमंत्रित केलेले आहे.