• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, February 9, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 14, 2017

जुईनगर सेक्टर २४ येथील ओमकार, पंचरत्न, महालक्ष्मी, सिध्दीविनायक या सोसायट्यांना नवीन मल:निस्सारण वाहिन्या जोडून देण्याची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नवी मुंबई महानगरपालिका 656 पदनिर्मितीस व महानगरपालिकेच्या आकृतीबंधास शासन मान्यता

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
जुईगर सेक्टर २४ मधील ओमकार, पंचरत्न, महालक्ष्मी, सिध्दीविनायक या गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहीवाशांना मल:निस्सारण वाहिन्यांच्या चोकअपमुळे होत असलेल्या त्रासाकडे महापालिका आयुक्तांचे लक्ष वेधताना कॉंग्रेसचे रोजगार व स्वंयरोजगारचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आणि इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी संबंधित सोसायटीमध्ये आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाल्याने तातडीने नवीन मलीनस्सारण वाहिन्या जोडून देण्याची लेखी मागणी केली आहे.
या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये अल्प व मध्य उत्पन्न गटातील रहीवाशी वास्तव्य करत असून मल;निस्सारण वाहिन्यांच्या गळतीमुळे त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे. या गृहनिमार्र्ण सोसायट्यांच्या प्रवेशद्वारालगतच तसेच सभोवतालच्या परिसरात मल:निस्सारण वाहिन्या या अरूंद असून ही वाहिनी सातत्याने चोकअप होत आहे. ही वाहिनी जमिनीमध्ये दहा ते फूट खोल असुन महापालिकेच्या संबंधित कामगारांना या मल:निस्सारण वाहिनीची साफसफाई करणे त्रासदायक ठरत असल्याचे रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे.
या मल:निस्सारण वाहिन्या चोकअप होवून तुंबलेले पाणी बाहेर पडते. या पाण्यामध्ये मलमूत्र, दुर्गंधी यामुळे स्थानिक रहीवाशांना वावरणे अवघड झाले असून त्यांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झालेला आहे. या परिसरात मंगलप्रभू हॉस्पिटलजवळ मोठ्या व्यासाची मल:निस्सारण वाहिनी आहे. या चारही सोसायट्यांना जोडण्यात आलेली मल:निस्सारण वाहिनी सोसायट्यांच्या पाठीमागील बाजूने काढून मंगलप्रभू हॉस्पिटलच्या वाहिनीला जोडल्यास या रहीवाशांची समस्या कायमस्वरूपी संपुष्ठात येणार असल्याचे रवींद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
मल:निस्सारण वाहिन्या चोकअप झाल्याने सोसायटी सभोवतालच्या परिसरालाही बकालपणा असून नागरिकांना नाक मुठीत ठेवून अनेकदा ये-जा करावी लागत आहे. रहीवाशांच्या आरोग्यावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाल्यानेे समस्येचे गांभीर्यही आयुक्तांच्या तात्काळ निदर्शनास येईल. आयुक्तांनी स्वत: या ठिकाणी येवून समस्येची खातरजमा करून घेण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी केली आहे.

Previous Post

शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागाने विशेष स्वच्छता मोहिम

Next Post

पालिका आयुक्तांच्या बैठकीत आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केला नवी मुंबईतील नागरी समस्यांचा पंचनामा

Next Post
पालिका आयुक्तांच्या बैठकीत आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केला नवी मुंबईतील नागरी समस्यांचा पंचनामा

पालिका आयुक्तांच्या बैठकीत आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केला नवी मुंबईतील नागरी समस्यांचा पंचनामा

शाळाशाळांतून साजरे होणार 15 सप्टेंबरला  फुटबॉल फेस्टीवल

शाळाशाळांतून साजरे होणार 15 सप्टेंबरला फुटबॉल फेस्टीवल

शालेय सुरक्षा व शालेय आपत्ती व्यवस्थापन आराखडा याबाबत प्रशिक्षण

शालेय सुरक्षा व शालेय आपत्ती व्यवस्थापन आराखडा याबाबत प्रशिक्षण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com