सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : अवघ्या ४८ तासावर येवून ठेपलेल्या नवरात्र उत्सवाची लगबग नवी मुंबईच्या कानाकोपर्यात सुरू आहे. नेरूळ पश्चिमेला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रभाग ८५ व ८६ आयोजित नवरात्र उत्सवाचे भाविकांना आणि गरबा प्रेमींनाही कमालीचे आकर्षण असते.
नेरूळ सेक्टर सहामधील तानाजी मालुसरे मैदानावर सलग तिसर्या वर्षी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रभाग ८५ आणि ८६ पुरस्कृत समृध्दी सेवाभावी संस्था आयोजित यंदाचे नवरात्र उत्सवाचे सलग तिसरे वर्ष आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सुरज बाळाराम पाटील हे या नवरात्र उत्सवाचे आधारस्तंभ असून प्रभाग ८५ मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील आणि प्रभाग ८६ मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सौ. जयश्री एकनाथ ठाकूर या नवरात्र उत्सवाच्या मार्गदर्शक आहेत.
हा नवरात्र उत्सव यशस्वी करण्यासाठी उत्सव कमिटीचे पदाधिकारी व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.