नवी मुंबई : स्वच्छ भारत मिशनच्या 3-या वर्धापन दिननिमीत्त 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत “स्वच्छता हीच सेवा” अंतर्गत स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्याअंतर्गत 25 सप्टेंबर रोजी ‘सर्वत्र स्वच्छता’: शहरातील हॉस्पिटल्स, उद्याने, पुतळे व स्मारके, बस थांबे, तलाव व स्वच्छतागृहांची व्यापक प्रमाणात सफाई करून सर्वत्र स्वच्छता करणेबाबत उपक्रम राबविण्यात आले.
त्याअनुषंगाने 25/09/2017 रोजी वाशी विभाग कार्यक्षेत्रातील वाशीगाव तलावामध्ये विशेष साफसफाई करण्यात आली. तसेच सेक्टर-14 मधील पालवे उद्यानामध्ये माळी कामगार व जेष्ठ नागरिक यांच्या सहभागाने विशेष स्वच्छता मोहिम घेण्यात आली. सदर मोहिमे अंतर्गत सेक्टर- 9 येथे बस स्थानकामध्ये साफसफाई तसेच सुलभ शौचालयाची स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत सेक्टर- 16, अ मधील छत्रपती शिवाजी चौक येथे स्मारकाची व सेक्टर- 17 येथील अभ्युदय बँक शेजारी असलेल्या पुतल्यांची विशेष साफसफाई करुन परिसरात स्वच्छता मोहिम घेऊन लोकसहभागातुन मोठयाप्रमाणात श्रमदान करण्यात आले. सदर कार्यक्रमावेळी वाशी विभागामधील विभाग अधिकारी महेंद्र ठोके, स्वच्छता निरीक्षक . जयश्री आढाळ, सरकटे, तांडेल, स्वच्छाग्रही व स्थानिक रहिवाशी सहभागी झाले होते.
तसेच 25/09/2017 रोजी वाशी सेक्टर-10 येथील प्रथम संदर्भ रुग्णालयाची विशेष स्वच्छता करण्यात आली या विशेष मोहिमेमध्ये रूग्णालयामध्ये अंतर्गत व परिसरात विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्वच्छता मोहिमेच्या वेळी संबंधित रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी रूग्ण व परिसरातील नागरिकांना स्वच्छतेबाबत विशेष मार्गदर्शन केले. सदर विशेष स्वच्छता मोहिमेमध्ये संबंधित रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. जवादे, डॉ.चव्हाण, डॉ.रविंद्र म्हात्रे, वैद्यकिय अधिक्षक निवासी डॉ. सिंग, मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर डॉ. ओतुरकर, बालरोग तज्ञ डॉ. दारुवाला, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, उप निरिक्षक स्वच्छाग्रही तसेच स्थानिक रहिवाशी मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.
त्याचप्रमाणे दिनांक 25/09/2017 रोजी बेलापूर विभाग कार्यक्षेत्रातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बेलापूर किल्ला व परिसरात विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सदर विशेष स्वच्छता मोहिमेमध्ये बेलापुर विभागाच्या सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी श्रीम. प्रियंका काळसेकर, स्वच्छता निरीक्षक श्रीम. कविता खरात, श्री.रविंद्र चव्हाण, श्री. मिलिंद तांडेल, श्री. पवन कोवे व स्वच्छाग्रही तसेच स्थानिक रहिवाशी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.व तसेच स्वच्छता निरिक्षक व स्थानिक नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.