सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नेरूळ पूर्व आणि पश्चिमेेला जोडणार्या हार्बर रेल्वे रूळावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पादचारी पुलाची दुरावस्था झालेली आहे. या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे यासाठी स्थानिक शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे पालिका प्रशासनाकडे गेल्या ११ महिन्यापासून लेखी पाठपुरावा करत आहे तसेच संबंधित पालिका अधिकार्यांकडे चपला झिजवित आहे. मात्र या पुलाच्या स्ट्रक्चर ऑडिटविषयी महापालिका प्रशासनाकडून गेल्या ११ महिन्यापासून विशेष कार्यवाही झालेली नाही. हा पुला कोसळ्ल्यास अथवा काही दुर्घटना झाल्यास यास सर्वस्वी महापालिका प्रशासन आणि या समस्येकडे कानाडोळा करणारे संबंधित अधिकारीच जबाबदार असतील असा इशारा शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी दिला आहे.
नेरूळ पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा हार्बर रेल्वे रूळावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पादचारी पुल महत्वपूर्ण आहे. नेरूळ सेक्टर १० मधील कै. नामदेव खाशाबा मांडवे मार्गानजीक साईबाबा हॉटेलच्या मागील बाजू ते पूर्वेकडील नेरूळ बस स्थानक यादरम्यान हा पादचारी पुल आहे. या पुलावरून दररोज हजारोच्या संख्येने विद्यार्थी, मुले, मुली, कॉलेजची मुले, रहीवाशी, महिला, ज्येष्ठ नागरिक ये-जा करत असतात. या पुलाला बांधून दोन दशकाचा कालावधी लोटलेला आहे. पुलाची अनेक भागात दुरावस्था झालेली आहे. पुलाकडे वेळीच लक्ष न दिल्यास दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे. ही दुर्घटना होवू नये यासाठी नोव्हेंबर २०१६ पासून शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे महापालिका प्रशासनाकडे लेखी पाठपुरावा करत या पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी करत आहेत. संबंधित अधिकार्यांच्या वेळोवेळी भेटीगाठी घेवून समस्येचे गांभीर्य संबंधितांच्या निदर्शनास आणून देत आहेत. या प्रभागाचे माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे हेदेखील पालिका अधिकार्यांच्या वेळोवेळी या समस्या निवारणासाठी हेलपाटे मारत आहे.
गेल्या वर्षभरात नगरसेविका मांडवे व माजी नगरसेवक मांडवे पुलाच्या दुरावस्थेविषयी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत असल्याचे स्थानिक रहीवाशांनी जवळून पाहिले आहे. आज -उद्या असे करत पालिका अधिकार्यांनी या समस्येप्रकरणी ११ महिने आजवर चालढकलच केली आहे. उद्या या पुलाबाबत कोणती दुर्घटना घडल्यास संबधित पालिका अधिकारीच त्यास जबाबदार असतील असा इशारा शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी दिला आहे.