अनंतकुमार गवई
नवी :- मुंबई अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या नवी मुंबई शाखेच्या विद्यमाने रविवार .८ ऑक्टोबर २०१७ रोजी सायं. ४.०० वा. एन. आर. भगत विद्यालय नेरुळ , नवी मुंबई येथे खुल्या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून एन.आर. बी. एज्युकेशन, सोशिएल व कल्चरल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष नामदेव भगत, अखिल भारतीय साहित्य परिषदेचे मुंबई शहर अध्यक्ष जयेंद्र खुणे, मुंबई प्रदेश अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर, ज्येष्ठ कवयित्री ललिता गवांदे, जेष्ठ पत्रकार अंकुश वैती, सुभाष हांडे देशमुख ज्येष्ठ साहित्यिका कौमुदी गोडबोले, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना नवी मुंबई शहर अध्यक्ष हृदयनाथ तांडेल, रायगड जिल्हा अध्यक्ष किरण बाथम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कवी संमेलनात सहभाग नोंदविणा ऱ्या कवींचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. तरी या कवी संमेलनात जास्तीत जास्त कवींनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक अमृत पाटील -नेरुळकर यांनी केले आहे.