पाच वर्षांच्या कालावधी नंतर मुंबईत प्रचंड महामोर्चा काढून प्रशासनाला वेठीस आणणाऱ्या मनसे प्रमुख , मराठी हृद्यसम्राट राज ठाकरे यांची इंजिन आता बुलेट पेक्षाही सुसाट निघाली आहे . मुंबई कुणाची हे ओरडून सांगण्याची मराठी भूमीपुत्राला आता गरज राहणार नाही . कारण 5 ऑक्टोबरला राज ठाकरेंच्या आवाहना नंतर मुंबईत निघालेला वादळी मोर्चा हा मुंबईवर डोळा ठेवून असणाऱ्या परप्रांतीय लोंढे व गुजराती भाषिकांसाठी एक ट्रेलर होता अस म्हंटल तर काही वावगं ठरणार नाही . मराठी माणूस जितका संयमी तेवढाच आक्रमक देखील आहे . मराठी माणसाच्या स्वभावाची सत्व परीक्षा अनेकांनी घेऊ पाहिली मात्र अनेकांचे प्रयत्न पालथे पडले आहेत . माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी मुंबई महाराष्ट्राला मिळवू न देण्याचा पुरेपूर घाट घातला होता . मराठी द्वेष्ट्या अनेकांनी मराठी माणसाला मुंबई पासून तोडण्याचा सातापार प्रयत्न केला मात्र विरोध करणाऱ्याच्या हाती वाळूच शिल्लक राहिली . मराठी माणूस नेहमीच संयमी असतो जेव्हा त्याचा संयम सुटतो तेव्हा सूर्याने आग ओकावी तसा मराठी माणूस अस्तित्वाची बाजी टिकवण्यासाठी आग ओकतो आणि भल्याभल्यांना या आगीत कोळसा करून टाकतो . राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत निघालेला मोर्चा हा मराठी माणसाचा केवळ संताप नव्हे तर नसानसातून भडकलेली आग आहे आणि ही आगच आता मनसेच्या इंजिनाला बुलेट पेक्षा सुसाट घेऊन जाणार आहे . अन्न , वस्त्र आणि निवारा या माणसाच्या तीन मूलभूत गरजा . या तीन गरजा मध्येच माणसाचे खरे सुख आहे . आणि हे सुख मिळवण्यासाठीच माणसाची दैनंदिन धावपळ सुरू आहे . मराठी माणसाचा एक इतिहास आहे . मराठी माणूस कधीच या आशेने या गरजा भागवण्यासाठी धावपळ करत राहिला नाही . मराठी माणूस नेहमीच शस्त्र उचलून चालत राहिला ते केवळ देव , देश अन धर्मासाठी . दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा म्हणूनच हिमालयाच्या मदतीला महाराष्ट्राचा सह्याद्री धावला आहे . मनसे संपली असं म्हणणाऱ्या विरोधकांना राज ठाकरे यांचा संताप मोर्चा विरोधकांच्या गालावर एक जोरदार लगावलेली चपराक आहे . दिवस मावळतो तो उगवण्यासाठी . राज ठाकरे यांची मावळलेली मनसे आता उगवते आहे . गुजराती भाषिकांची मक्तेगिरी , परप्रांतीयांची गर्दी मराठी माणसाच मुंबईतलं अस्तित्व कमी करू पाहत आहे . विकासाच्या नावाखाली मुंबईतील परिस्थिती अशीच सुरु राहली तर एक टक्का देखील मराठी माणूस मुंबईत दिसणार नाही …. आज महागाईच्या वणव्याने मराठी माणसाची पावलं स्वस्त निवाऱ्यासाठी मुंबईच्या बाहेर पडत आहे . मराठी माणसाशी भांडून मुंबई मिळवता येणार नाही तर मराठी माणसाच मानसिक खच्चीकरणं करून मुंबई जिंकण्याचा गुजरातींचा डाव दिसतो आहे . रिलायन्स मेट्रोच्या विकासकामात घाटकोपर ते वर्सोवाच्या दरम्यान वीस हजार मराठी कुटुंबे मुंबई बाहेर फेकली गेली . मेट्रो , मोनो , बुलेट हा विकास नाही तर मराठी माणसाला विकासाच्या नावाखाली मुंबई पासून तोडण्याच षडयंत्र सुरु आहे . मुंबई ही मराठी माणसाची माय आहे . राज ठाकरे यांचा मनसे हा राजकीय पक्ष जरी असला तरी मुंबईला मनसेशिवाय तारणहार नाही . स्वर्गीय हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर राज ठाकरे हेच या भूमीचे आशास्थान आहेत . मराठी माणसाने विश्वासार्हपणे राज ठाकरे यांच्या मागे उभे राहिले पाहिजे . अनेक जण केल्या नंतर करून दाखवले म्हणतात मात्र महाराष्ट्रात एकमेव नेता असा आहे की जो बोलतो ते करून दाखवतो . टोल नाका , रेल्वे भरती , मराठी पाट्या , परप्रांतीय आंदोलन , पोलिसांसाठी आझाद मैदानात मूक मोर्चा अन आता चेंगराचेंगरीत फसलेल्या सामान्य माणसासाठी रेल्वे मुख्यालयावर काढलेला प्रचंड महामोर्चा आज सत्ता नसतानाही राज ठाकरे यांनी मराठी माणसाच्या समस्यां सोडवन्यात यश मिळवले आहे . लोकसभा , विधानसभा आणि महानगर पालिकेत दारुण पराभव होऊन सुद्धा राज यांनी हार न पत्करता निमूटभर कार्यकर्त्यांच्या साक्षीने पुन्हा एकदा सिंह गर्जना देत महाराष्ट्र पिंजून काढत नवनिर्माणाच्या दिशेकडे पाऊल टाकले आहे .कालोख्याच्या अंधारात सापडलेली मनसे आता उजेडात प्रकाशाची किरणे होऊन महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात पसरते आहे . तुमच्या राजाला साद द्या या गाण्यात आता कसला ही वाद नाही कारण महाराष्ट्रातल्या जनतेने आता राज ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी विकासरुपी साथ दिली आहे .
— निलेश पांडुरंग मोरे मो – 9867477598