स्वयंम न्युज ब्युरो : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : नेरूळमधील छत्रपती कला, क्रिडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने काढण्यात येणार्या नेरूळ ते शिर्डी पदयात्रेला रविवारी सकाळी उत्साहात प्रारंभ झाला होता. नेरूळ सेक्टर १८ मधून सुरू झालेल्या या शिर्डीॅच्या पदयात्रेमध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते.
रविवारी, दि. २२ ऑक्टोबर रोजी निघालेली ही शिर्डी पदयात्रा रविवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी शिर्डीत पोहोचणार असून त्यानंतर साई भक्तांसाठी नेरूळमध्ये महाभंडार्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
या पदयात्रेच्या सुरूवातीला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत, शिवसेनेचे नगरसेवक काशिनाथ पवार, सुनिलशेठ हुंडारे, माजी नगरसेवक सतीश रामाणे, समाजसेवक किसमत भगत, रवी भगत, के.डी.भालके यांच्यासह साई भक्त आणि स्थानिक रहीवाशी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.