नवी मुंबई : पत्रकार समाजाचा आरसा असून त्यांचे कार्य समाजासाठी उल्लेखनीय आहे. समाजासाठी धडपड करणाऱ्या पत्रकारांचे प्रश्न आहेत, ते मार्गी लागून त्यांना न्याय मिळालाच पाहिजे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज (दि. १४ )येथे केले.
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष सय्यद अकबर, उपाध्यक्ष संजय कदम, कार्याध्यक्ष दीपक घोसाळकर, सरचिटणीस केवल महाडिक, चिटणीस रविंद्र गायकवाड, खजिनदार निलेश सोनावणे, सहखजिनदार नितीन कोळी, सल्लागार विजय कडू यांचा लोकनेते रामशेठ ठाकूर व भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी पत्रकार अनिल भोळे, किरण बाथम, अनिल कुरघोडे, संतोष भगत, मयूर तांबडे, प्रविण मोहोकर, बाबुराव खेडेकर, गणपत वारगडा, भरतकुमार कांबळे, विन्सेन्ट सॅबॅस्टीन आदी पत्रकार उपस्थित होते.
यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुढे बोलताना म्हंटले कि, सय्यद अकबर भाजपच्या अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश प्रवक्ते म्हणून काम करीत आहेत. पत्रकार म्हणून काम करीत त्यांच्यावर आता पत्रकार संघर्ष समितीची जबाबदारी देण्यात आली असून हि जबाबदारी ते योग्यरीत्या पार पाडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.