सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नेरूळ पूर्वेला बस डेपो शेजारी पोष्ट कार्यालय आहे. या कार्यालयात पोष्ट पाकिटे गेल्या २० ते २२ दिवसापासून नसल्याने ज्येष्ठ नागरिेकांची व स्थानिक रहीवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.
या पोष्ट कार्यालयालगत लष्करातून निवृत्त झालेल्या अधिकार्यांची मोठी वसाहत आहे. याशिवाय मध्य व अल्प उत्पन्न गटातील रहीवाशांची सिडको वसाहतही विस्तारलेली आहे. येथे जवळ कुरिअर कार्यालयही नसल्याने स्थानिकांना पोष्ट कार्यालयावरच अवलंबून राहावे लागते. पोष्ट पाकिटाची किंमत ५ रूपये असून ज्येष्ठ नागरिक आजही या पाकिटाचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असल्याची माहिती पोष्टातील कर्मचारी देतात. याबाबत अधिक माहिती विचारल्यास पोष्टातील कर्मचारी व अधिकारी नकार देतात. जे काही सांगायचे असेल ते ०२२-२७४५७९५८ या पनवेल कार्यालयातील वरिष्ठांना विचारा असे उत्तर देतात. या क्रमांकावर वारंवार फोन केल्यास कोणी फोन उचलण्याची तसदीही घेत नाही. पोष्टात पाकिटाशिवाय अन्य स्टेशनरीचाही नेहमीच दुष्काळ असल्याचे सांगण्यात येत आहे.