नवी मुंबई : सानपाडा सेक्टर ११ मधील बॅक ऑफ बरोडावर भुयार खोदून दरोडा टाकण्यात आला. शनिवार-रविवार दोन सुट्टीचे दिवस पाहून हा दरोडा पडला होता. सोमवारी सकाळी, १३ नोव्हेंबरला बॅक उघडल्यावर दरोड्याचा प्रकार उघडकीस आला.
भक्ती रेसिडन्सी या इमारतीमध्ये बॅक ऑफ बरोडाची जुईनगर शाखा असून त्याच इमारतीच्या शॉप क्रं ७ मधील बालाजी जनरल स्टोअर्समधून हे भुयार खोदण्यात आले आहे. पाच ते बारा फुट खोल, अडीच फुट रूंद आणि अंदाजे ४५ ते ५० फुट लांबवर हे भुयार खोदण्यात आले आहे. बालाजी जनरल स्टोअर्स हे शरद कोठावळे यांच्या मालकीचे असून ते गेनाप्रसाद यांना चार महिन्यापूर्वी भाड्याने देण्यात आले होते. भुयार खोदताना माती पसरू नये यासाठी भुयारात सर्वत्र लाकडी प्लाय लावण्यात आले होते. बॅकेत एकूण २३७ लॉकर असून त्यातील ३० लॉकर तोडण्यात आले आहेत. कोणते लॉकर तोडण्यात आले आहेत तेही बॅकेने प्रसिध्द केले आहे. सुमारे ७० हून अधिक लॉकर तोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला होता. त्यामध्ये ३० लॉकर फोडण्यात त्यांना यश आले.
याप्रकरणी पोलिसांनी १० जणांना अटक केली असून अन्य त्यांचा साथीदार गेनाप्रसाद हा दरोडा टाकण्यापूर्वीच एक महिना अगोदर मेंदूच्या आजाराने मयत झाला होता.
सानपाडा, सेक्टर-११ येथील बँक ऑफ बडोदाच्या जुईनगर शाखेवर अंडरग्राऊंड भुयाराच्या माध्यमातून दरोडा टाकून फरार
झालेल्या दरोडेखोरांच्या टोळीतील आतापर्यत
१) श्रावण हेगडे
२) मोईन खान
३) हाजी अली मिर्झा बेग
४) अंजन मांझी उर्फ अंजु यांना गोवंडी बैंगनवाडीतून अटक केली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली इर्टीगा व काही दागिनेही हस्तगत केली आहे.
५) संजय वाघ मालेगावचा सोनार, यास दरोड्यातील सोने विकले होते.
६) मोईद्दीन शेख यास कोलकाता हावडा येथून अटक केली
७) किशन मिश्रा यास उत्तर प्रदेशातून अटक केली आहे
८) शुभम वर्मा यास अलाहाबाद येथून अटक केली आहे.
९) आदेश वर्मा यासही नवी मुंबई पोलिसांनी अलाहाबाद येथून अटक केली आहे.
१०) हाजी अलीची बहीण मेहरून्निसा हिला पुण्यातून अटक
दहा आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सात किलो सोने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये दरोडा पडला असला तरी अशा प्रकारे बॅॅकेवर दरोडा टाकावा यासाठी दरोडड्यातील मुख्य आरोपी हाजी अली मिर्झा बेग २२०१४ पासूनच दरोड्यासाठी जुळवाजुळव व बॅकेचा शोध घेत होता.
अटकेत असलेल्या दहा आरोपींपैकी सहा जणांना महाराष्ट्रात, तीनजणांना उत्तर प्रदेशात तर एकाला कोलकता येथे जावून अटक केली आहे. पोलिसांची सर्व पथके नवी मुंबईत परत आली आहेत.
* दरोडाप्रकरणानंतर राजकीय क्षेत्रातील हालचाली
१) दरोडा उघडकीस आल्यावर भाजप आमदार मंदा म्हात्रे यांची बॅकेला तात्काळ भेट .
२) काही दिवसांनी शिवसेना खासदार राजन विचारे यांचे बॅकेत सुमारे पाच तासाहून अधिक काळ ठिय्या आंदोलन. लॉकरधारकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी, बॅकेकडूनही ती मागणी मान्य.
३) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खासदार संजीव नाईक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाकडून पोलीस आयुक्तांची भेट.
अवघ्या २१ दिवसात बॅक ऑफ दरोडा प्रकरणाचा उलगडा