• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, March 24, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 30, 2017

‘बाळराजें’च्या मित्रांना वाचवण्यासाठी कमला मिलमध्ये तोंडदेखली कारवाई सुरु! विखे पाटील

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
‘बाळराजें’च्या मित्रांना वाचवण्यासाठी कमला मिलमध्ये तोंडदेखली कारवाई सुरु! विखे पाटील

मुंबई : कमला मिल कंपाऊंडमधील अनधिकृत बांधकामाविरुद्ध सुरु झालेली कारवाई हा केवळ फार्स आहे. प्रत्यक्षात बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या हॉटेल्सचे मालक हे ‘बाळराजें’चे जिवश्च कंटच्च मित्र आहेत. त्यांना या प्रकरणातून सुखरुप बाहेर काढण्यासाठी अधिकाऱ्यांचे निलंबन आणि बेकायदेशीर बांधकाम पाडण्याची तोंडदेखली कारवाई सुरु आहे, असा थेट  आरोप करुन विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे.

विखे पाटील यांनी आज कमला मिल कंपाऊंडमधील घटनास्थळाची पाहणी केली व त्यानंतर त्यांनी भाजप व शिवसेनेवर जोरदार शरसंधान केले. ‘मोजेस ब्रिस्ट्रो’ व ‘वन अबव्ह’ या दोन्ही हॉटेल्समध्ये बेकायदा व असुरक्षित बांधकाम झाल्याची पूर्ण माहिती महानगरपालिकेला होती. परंतु १४ निरपराध मुंबईकरांचे बळी जाईस्तोवर महानगर पालिका प्रशासनाने याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले कारण या हॉटेल्सच्या मालकांचे धागेदोरे थेट भाजप आणि शिवसेनेच्या वजनदार नेत्यांशी जुळले असल्याची जाणीव महानगरपालिकेला होती त्यामुळेच या हॉटेल्सविरुद्द कारवाई झाली नाही, असे सांगून विरोधी पक्षनेत्यांनी मोजेस ब्रिस्टो या हॉटेलचा ऑगस्ट महिन्यातील इनेस्पेक्शन रिपोर्ट प्रसारमाध्यमांसमोर सादर केला.

मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराचे मागील पाच महिन्यात 75 बळी गेलेले आहेत. त्यामुळे फक्त अधिकाऱ्यांना निलंबित करून अशा घटना थांबणार नाहीत तर मुंबई महापालिकेत तयार झालेली भ्रष्ट अधिकाऱ्यांची, दलालांची आणि त्यांना राजाश्रय देणाऱ्यांची टोळी उद्धस्थ झाली पाहिजे असे विखे पाटील म्हणाले. कमला मील कंपाऊंडमध्ये 14 जण गेले आणि लगेच पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. बाकी ठिकाणी कारवाई झाली नाही आणि येथे कारवाई झाली, हाच हे प्रकरण दडपले जाणार असल्याचा मोठा पुरावा आहे. या पाच अधिकाऱ्यांचे निलंबन दाखवून यातील मुळ सुत्रधारांना वाचवण्याच्या दिशेने सरकारची पावले पडत आहेत असेही विरोधी पक्षनेते म्हणाले.

मुंबई महापालिकेत पहारेकऱ्याची भूमिका बजावणाऱ्या भाजपने आता जागे झाले पाहिजे असा टोला लगावत त्यांनी राज्याची सत्ता टिकवण्यासाठी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराला संरक्षण देण्याचे पाप मुख्यमंत्र्यांनी करु नये असे ते म्हणाले.मुंबई महापालिकेत रुफ टॉपवर बसून नाईट लाईफच्या गप्पा करणाऱ्यांना आता जमिनीवर आणण्याची वेळ आली आहे असंही ते म्हणाले.

कमला मिलसारखीच परिस्थिती टोडी मिल, रघुवंशी मिल आणि फिनिक्स मिलची आहे. या सर्व मिलच्या जागेवर अनधिकृत आणि सुरक्षेसाठी गंभीर धोका असलेले हॉटेल्स उभे झाले आहेत. कमला मिलमध्येच ‘स्मॅश’ नावाचा पब आणि गेमींग झोन आहे तेही अनधिकृत, नियमबाह्य असल्याची माहिती माझ्याकडे आहे असे ते म्हणाले. यावेळी विखे पाटील यांच्यासोबत मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय निरुपम, आमदार भाई जगताप, माजी आमदार चरणसिंग सप्रा आदी नेते उपस्थित होते.

Previous Post

मनोज मेहेरच्या पाठपुराव्यामुळे सारसोळेतील बुध्या बाळ्या वैती मार्ग झाला प्रकाशमय

Next Post

खासदार राजन विचारे यांच्या मातोश्रींचे निधन

Next Post
खासदार राजन विचारे यांच्या मातोश्रींचे निधन

खासदार राजन विचारे यांच्या मातोश्रींचे निधन

आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांची सिडको एम.डी. भूषण गगराणी यांजबरोबर यशस्वी चर्चा

आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांची सिडको एम.डी. भूषण गगराणी यांजबरोबर यशस्वी चर्चा

पाकशी चर्चा करता, मग सराफांशी का नाही? : उद्धव ठाकरे

गुजरातमध्ये विकासाची रांगोळी काढणार्‍यांनी कोकणची राख करू नये - उध्दव ठाकरे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com