स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६ – ८०८२०९७७७५
नवी मुंबई : शिवसेनेचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजन विचारे यांच्या मातोश्री पुष्पा बाबुराव विचारे यांचे सोमवार, दि. १ जानेवारी २०१८ रोजी वयाच्या ९१ व्यावर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.
गेल्या चार दिवसापासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा खासदार राजन बाबुराव विचारे व प्रमोद बाबुराव विचारे तसेच मुलगी उषा तुकाराम चव्हाण, मंदा गोपीनाथ कदम, सुषमा उल्हास सुर्वे, मीना मंगलदास प्रभू, त्यांच्या सुना नगरसेविका नंदिनी राजन विचारे, प्रिया प्रमोद विचारे व नातवंडे माजी नगरसेवक मंदार प्रमोद विचारे, लतीषा राजन विचारे, धनश्री राजन विचारे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा डी अल्मेडा अपार्टमेंट चरई येथील राहत्या घरून मंगळवार दि. २ जानेवारी २०१८ रोजी सकाळी १० वाजता निघेल.