राहुल शिंदेंची महापौर व आयुक्तांकडे मागणी
दिपक देशमुख
नवी मुंबई :- १४ एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनानिमित्त जयंती संपूर्ण भारतात साजरी केली जाणार आहे. नवी मुंबई शहरात महापालिकेच्या माध्यमातून ऐरोली सेक्टर १५ येथे डॉ.बाबासाहेब आबेडकरांचे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकाचे उदघाटन गेल्या काही महिन्यांपूर्वी झाले आहे. बेलापूर येथील महापालिकेच्या मुख्यालयावर ज्या प्रमाणे आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते त्याधर्तीवर १४ एप्रिल रोजी देखील ऐरोली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे ऐरोली विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे यांनी महापौर जयवंत सुतार आणि आयुक्त रामास्वामी एन.यांच्याकडे इमेलद्वारे केली आहे .
त्याचप्रमाणे हिंदू संस्कृतीप्रमाणे गुडी पाडवा या सनापासून नवीन वर्षांची सुरुवात मनाली जाते पुढच्या वर्षांपासून गुडी पाडव्याच्या दिवशी देखील पालिका मुख्यालयावर विद्युत रोषणाई करण्यात यावी अशी देखील मागणी शिंदे यांनी केली आहे.