पनवेल :- महापालिका क्षेत्रातील 45 सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘सामाजिक संस्थांच्या समन्वय समितीच्या’ अध्यक्षपदी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांची एकमताने निवड करण्यात आली. 17 सदस्यांसह पदाधिकार्यांची निवड अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आज पार पडलेल्या बैठकीतून करण्यात आली.
कामोठे येथील श्री दत्तूशेठ पाटील विद्यालयाच्या सभागृहात पनवेल महापालिका क्षेत्रातील सामाजिक संस्थांच्या सदस्यांची बैठक संपन्न झाली. प्रत्येक संस्थेचे अस्तित्व अबाधित ठेवून त्या-त्या सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधींची समन्वय समिती स्थापन करण्यात आली असून महत्वाच्या नागरी प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी ही समिती अग्रेसर राहणार आहे. सरकार आणि सामान्य जनतेचा दुवा म्हणून कार्यरत राहताना सामाजिक संस्था आणि सामान्य नागरिकांना समन्वय समितीचे सदस्य होता येईल, असा अजेंठा ठेवण्यात आला आहे. सामाजिक प्रश्नांसोेबत पर्यावरण, नदी संवर्धन, प्रदुषण मुक्त शहरांसाठी उपाययोजना आदींबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
नव्याने स्थापन करण्यात आलेल्या समन्वय समितीमध्ये कांतीलाल कडू (अध्यक्ष), रंजना सुडौलकर (कामोठे) व प्रा. अनुराग लेकुरवाले (खांदा कॉलनी) यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सेक्रेटरी कॅप्टन एस. एच. कलावत (खारघर), सहसेक्रेटरी दीपक सिंग (कळंबोली) तर खजिनदारपदी ऍड. संध्या मनोज शिरब्रिंदे-पाटील (खारघर) तसेच सदस्यपदी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरूण भिसे, कीर्ती मेहरा, सचिन गायकवाड, अमोल शितोळे, कॅप्टन ए. पी. एस. तलवार, संदीप जाधव, प्रकाश चांदिवडेकर, ज्योती नाडकर्णी, शोभा लावंड, सलिना नाईक, उज्वल पाटील आदींची निवड करण्यात आली आहे.
सामाजिक संस्थांच्या समन्वय समितीचे सभासद होण्यासाठी आपली नावे कीर्ती मेहरा (9323193942), ऍड. शोभा शिरबिंद्रे (9987851484), चंद्रकांत शिर्के (8169212198), ज्योती नाडकर्णी (9619989730), बापू साळुंखे (9817526666), प्रशांत रणबिरे (8433187280), रणजित सोनी (8108888199) आदींशी संपर्क साधण्याचे आवाहन समन्वय समितीने केले आहे.
सभासद फी फक्त शंभर रूपये आकारण्यात येणार आहे, असे संस्थेच्या वतीने ठरविण्यात आले असून वर्षभरात 1 हजार सभासदस्यांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.