दिपक देशमुख
नवी मुंबई :घणसोली डेपोला दोन वर्ष्या पूर्वी परिवहन विभागाने 114 नव्या कोऱ्या बस दिल्या गेल्या.परंतु तिथे कार्यरत असणाऱ्या ठेकेदारांनी बसेसची योग्य प्रकारे निगा न राखल्याने सध्या या बसेस नादुरुस्त होण्याच्या प्रकाराला चालक व वाहक कंटाळले असून संबंधित ठेकेदाराला हाकला अशी मागणी नवी मुंबई कामगार व कर्मचारी संघटनेचे सचिव प्रकाश चिकणे यांनी केली आहे.
घणसोली डेपो 26 मे 2016 मध्ये सुरू झाला.या डेपोसाठी मनपा परिवहन विभागाने सुरुवातीला 80 वातानुकूलित, मोठ्या ,मिनी व मिडी अश्या बसेस दिल्या.सद्यस्थितीत बसेसची संख्या 114 इतकी आहे.विशेष म्हणजे या सर्व बसेस नवीन होत्या.परंतु सध्या या बसेस मध्येच बंद पडणे,एक बाजूला झोक जाणे,इंजिन बंद पडणे,कोणत्याही ठिकाणी डीझेल संपणे,आग लागणे असे प्रकार घडत असल्याने चालक व वाहक चक्रावून गेले असल्याचे नवी मुंबई कामगार व कर्मचारी सेनेचे सचिव प्रकाश चिकणे यांचे म्हणणे आहे.
मनपा प्रशासनाने कोणताही विचार न करता महालक्ष्मी ट्रान्सपोर्ट या कंपनीला या डेपोचा ठेका बहाल केला होता.हा ठेका परिवाहनच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना पटला नव्हता.परंतु आता बसेसची अवस्था पाहून चालक व वाहक कंटाळले असून याचा त्रास सार्वसामान्य प्रवाश्याना होत असल्याने संबंधित ठेकेदारा विषयी मनपा आयुक्तांनी विचार करावा अशीही मागणी प्रकाश चिकाने यांनी केली आहे.
मनपा परिवहन विभागाचे एकूण तीन डेपो साध्यस्थीतीत चालू आहेत. त्यापैकी तुर्भे व आसूडगाव आगार स्वतः परिवहन विभाग पहाते तर घणसोली आगर महालक्ष्मी ट्रान्स्पोर्टला दिला गेला आहे.हे परिवहन प्रशासनाने का केले हे माहिती नाही पण सध्या घणसोली आगारातील बसेसची अवस्था व त्यांच्या कडे केलेले दुर्लक्ष पाहून महालक्ष्मी ट्रान्सपोट च्या ठेकेदाराला कोल्हापूरचा रस्ता दाखवावा असे मत प्रकाश चिकणे यांनी केली आहे.
या बाबत परिवहन सभापती प्रदीप गवस यांना विचारले असता,अश्या प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून संबंधित ठेकेदाराला बसेसची निगा राखण्याचे आदेश देण्यात आले आहेत.त्यांनी जर बसेसची योग्य प्रकारे दुरुस्ती केली नाही तर आम्हाला पुढचा निर्णय घ्यावा लागेल असे सांगितले.