दिपक देशमुख
नवी मुंबई :नागरिकांच्या हक्काच्या क्षेत्र सभा मनपाने सुरू कराव्यात म्हणून नवी मुंबईतील एक सामाजिक कार्यकर्ता गेल्या वर्ष्या पासून नियमानुसार अनेक आयुधांचा वापर करत असताना मनपा कोणत्याही प्रकारची कार्यवाही करत नसल्याने आता त्या सामाजिक कार्यकर्त्यांनी क्षेत्र सभा सुरू कराव्यात म्हणून खुद्द मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे.तश्या प्रकारचा लेखी अर्ज त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला दिला आहे.
मुंबई महानगर पालिका प्रांतिक अधिनियम 29 ब व क नुसार मनपाच्या 111 प्रभागात क्षेत्र सभा दरसहा महिन्याला एकदा विभाग कार्यालय अंतर्गत सुरू व्हाव्यात म्हणून सामाजिक कार्यकर्ते मंगेश म्हात्रे हे गेल्या एक वर्ष्या पासून प्रयत्न करत आहेत.त्यासाठी त्यांनी आयुक्त, उपायुक्त यांना अनेकदा पत्रव्यवहारही केला आहे.तसेच माहिती अधिकार कायद्याचा वापर करून माहितीही मिळवली आहे.तरीसुद्धा मनपा अधिकारी त्यांच्या पत्र व्यवहाराला भीक घालत नाहीत.म्हणून सामाजिक कार्यकर्ते मंगेश म्हात्रे यांनी कोकण आयुक्त कार्यालयाला पत्र व्यवहार सुरू केला.कोकण आयुक्तांनीही मनपा आयुक्तांना क्षेत्र सभा करण्याचे सुचविले .परंतु त्यांच्याही पत्राला मनपाच्या प्रशासनाने केराची टोपली दाखविल्याचे सामाजिक कार्यकर्ते मंगेश म्हात्रे यांनी सांगितले.माहिती अधिकार कायद्या अंतर्गत विचारलेल्या माहितीला काम चालू आहे या व्यतिरिक्त काहीही सांगत नसल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.
क्षेत्र सभेचा मूळ हेतू प्रभागातील नागरिकांना एकत्र घेऊन आपल्या प्रभागात असणाऱ्या नागरी समस्या सोडविणे हा आहे.ह्या सभा झाल्या तर चांगल्याच नागरी आमस्या सुटण्यास मदत होईल व सर्वसामान्य नागरिकांना आपले मत मांडता येईल असा दावा मंगेश म्हात्रे यांनी केला आहे.परंतु नागरिका कडून प्रशासनाने व नगरसेवकांनी केलेले गौडबंगाल समोर येतील म्हनुनच क्षेत्र सभा घेण्यास मनपा होकारात्मक निर्णय घेत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते म्हात्रे यांनी केला आहे.
मनपा प्रशासन क्षेत्र सभा घेत नाहीत म्हणून महानगर पालिका आधिनियमान कायदा 29 ब व क चा उल्लंघन होत आहे.त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कायद्याचा उल्लंघन केले म्हणून कारवाई करावी अशी मागणीही सामाजीक कार्यकर्ते म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.अश्याच प्रकारचे एक पत्र बेलापूर मतदार संघाच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनाही सामाजिक कार्यकर्ते मंगेश म्हात्रे यांनी दिले असून त्यांनाही क्षेत्र सभा सुरू करण्यासाठी विनंती केली आहे.