दीपक देशमुख
नवी मुंबई : घणसोलीतील नाल्यालगत तसेच नाल्यात मोठ्या प्रमाणावर डेब्रिज पडलेले आहे. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच पावसाळीपूर्व कामाचा एक भाग म्हणून गटारे व नाले सफाईला सुरूवात झालेली आहे. घणसोली नाल्यातील डडेब्रिज काढायला महापालिका प्रशासन व सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्र्रेस मुहूर्ताची प्रतिक्षा करत आहे काय, असा संतप्त सवाल घणसोलीवासियांकडून विचारला जात आहे.
मनपाच्या हद्दीत डेब्रिजचा प्रश्न भयानक होत असताना घनसोलीत नागरी काम करत असतानाच निघालेला डेब्रिज थेट नाल्यात ढकलला जात आहे. याकडे कुणाचेही लक्ष नसल्याने अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून त्यांना सहकार्य करत असलेल्या पालिका अधिकार्यावर कारवाई करावी अशी मागणी आरपीआय खोब्रागडे गटाचे नवी मुंबई पदाधिकारी शाम मेहता पाटील यांनी केली आहे.
घणसोली नोड परिसरातील सेक्टर ६ ते ९ दरम्यान नाल्या लगत असणार्या मोकळ्या भूखंडाचे अमृत योजने अंतर्गत सौन्दर्यीकरण करण्यात येत आहे. या ठिकाणी वेगवेगळी कामे करत असताना निघालेला डेब्रिज आजही जसा आहे तसा असल्याने त्याचा परिणाम भविष्यात मोठा दिसेल असेही शाम मेहता पाटील यांनी सांगितले. या कामासाठी केंद्र सरकारजकडून दिड कोटींचा निधी मिळाला असल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले.
मनपाद्वारे दरवर्षी ठेकेदारा कडून नाले सफाई केली जाते. यावेळी नाले सफाई करताना संबंधित ठेकेदाराला या डेब्रिज मुळे अनेक अडचणी निर्माण होणार आहेत. जर नागरि कामे करताना निघालेला डेब्रिज वेळीच काढला नाहीतर याचे परिणाम पावसाळ्यात वाईट दिसतील. त्यामुळे निघालेला डेब्रिज वेळीच उचलणे गरजेचे असल्याचे आर पी आय खोब्रागडे गटाचे मेहता पाटील यांनी मागणी केली आहे.
अमृत योजने अंतर्गत जे नागरी काम चालू आहे. त्याठिकाणी उद्यान विभाग व बांधकाम विभागाचे अधिकारी नियमित भेट देत असतात. साहजिकच डेब्रिज उचलणे गरजेचे आहे हे त्यांच्या लक्षात येणे गरजेचे होते. परंतु निघालेला डेब्रिज संबंधित ठेकेदारांनी कुणाचीही मुलाहिजा न बाळगता थेट नाल्याच्या किनारी आपला वाहतुकीसाठी लागणारा पैसे वाचवा म्हणून ठेवला आहे. तो डेब्रिज हळू हळू नाल्यात जात आहे. काही दिवसातच पावसाळा सुरू झाला की थेट नाल्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नाल्यात डेब्रिज जाऊन पावसाळ्यात नाल्यालागत वास्तव्य करणार्या नागरिकांना याचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ठेकेदार व संबंधित अधिकार्यावर कारवाई करण्याची गरज असल्याचेही शाम मेहता पाटील यांनी सांगितले. याबाबत कार्यकारी अभियंता अनिल नेरपगार यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.