स्वयंम न्यूज ब्युरो :- ८३६९९२४६४६
* सरकार सर्वसामान्यांच्या पाठीशी * वैजनाथ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच व कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
पनवेल :- सर्वसामान्य नागरिकांचा सर्वांगिण विकास करणे, हा भाजपचा मूळ उद्देश आहे, त्या अनुषंगाने केंद व राज्य सरकारच्या माध्यमातून लोककल्याणकारी योजना राबविल्या जात असून त्या तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सतत सक्रिय रहावे, असे आवाहन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज (सोमवार, १४ मे ) येथे केले.
अखिल गुरव समाजाच्या कर्जत तालुका महिला अध्यक्षा व वैजनाथ ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सुनिता खंडू गुरव तसेच कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. त्यावेळी मार्गदर्शन करताना आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते. पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास माजी आमदार देवेंद्र साटम, भाजपचे कर्जत तालुकाध्यक्ष दीपक बेहेरे, जिल्हा चिटणीस बंडू खंडागळे, हरेश खंडागळे, प्रज्ञा प्रकोष्टचे तालुका संयोजक मंदार मेहंदळे, नैना गुरव, मुकुंद मुकणे, विनीत चक्रदेव, मनोहर मुंबईकर आदी उपस्थित होते.
बंडू खंडागळे यांच्या प्रयत्नातून हा पक्ष प्रवेश झाला असून शिवसेनेच्या कार्यकर्त्या व वैजनाथ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सुनिता गुरव, मारुती मिसाळ, भाऊ पवार, लक्ष्मण मुकणे, विठ्ठल पवार, सुरेखा पवार, तुळशी पवार, सुवर्णा घनवट, मछिंद्र वाव्हळ, सुनंदा गुरव, सुलोचना गुरव, पांडुरंग गुरव, श्रीरंग गुरव, सुलभा गुरव, रमेश गुरव, सुरेश कौदरे, खंडू गुरव, रविंद्र गुरव, कृष्णा मुकणे यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवगतांचे स्वागत करून या प्रवेशामुळे भाजप अधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला. तसेच आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू, अशी ग्वाहीही आ. ठाकूर यांनी दिली. ते पुढे म्हणाले कि २०२२ सालापर्यंत प्रत्येकासाठी घर देण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे, त्यानुसार केंद्र व राज्य सरकार काम करीत असून जनहिताची विविध योजना राबविणारे हे सरकार सर्वसामान्यांच्या पाठीशी आहे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी बोलताना नमूद केले.