नवी मुंबई : चव अस्सल महाराष्ट्राची म्हणून प्रसिध्द असणारी आणि अल्पावधीतच खवय्यांची पहिली पसंती नसलेली ‘स्पे. सरपंच थाळी’ नवी मुंबईकरांच्या सेवेसाठी दाखल होत आहे. तूर्भेतील भगत ताराचंद हॉटेलजवळील हॉटेल वैशालीमध्ये १९ जुनपासून ही ‘स्पे.सरपंच थाळी’ खवय्यांना उपलब्ध होणार आहे.
हॉटेल वैशाली या फॅमिली रेस्टॉरन्टचे उद्घाटन नवी मुंबईचे शिल्पकार असणारे लोकनेते गणेश नाईक यांच्या हस्ते सकाळी ९.३० वाजता होत असून यानंतर ‘स्पे. सरपंच थाळी’ खवय्यांना उपलब्ध होणार आहे. ‘स्पे. सरपंच थाळी’चा आस्वाद घेवू इच्छीणार्यांनी अधिक माहितीसाठी ०२२-२७८८०८८३ या क्रमांकावर संपर्क साधावा.