मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना अचानक छातीत दुखू लागल्याने मुंबईतील जसलोक रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोर्टाच्या दिशेने जात असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. आज त्यांना कोर्टात हजर व्हायचे होते. मात्र त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना जसलोक रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर डॉक्टर मेहता हे छगन भुजबळ यांच्यावर उपचार करत आहेत. त्यांना श्वास घ्यायलाही त्रास होतो आहे. त्यांना जास्त त्रास झाला तर लीलावती रूग्णालयातही त्यांना हलवण्यात येऊ शकते अशीही शक्यता आहे.