अमोल इंगळे
नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रभाग ८५ व ८६च्या वतीने कुकशेत गावाच्या महापालिका शाळेत नागपंचमी उत्सव-२०१८ उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दुपारी २ ते सांयकाळी ६ या वेळेत या नागपंचमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नवी मुंबई महिला जिल्हाध्यक्षा माधुरी सुतार, ब प्रभाग समिती अध्यक्षा कविता आंगोडे, स्थायी समितीच्या माजी सभापती सौ. नेत्रा शिर्के, नगरसेविका तनुजा मढवी, नगरसेविका रूपाली भगत, नगरसेविका ऍड. सौ. सपना गावडे, माजी नगरसेविका सुरेखा इथापे, माजी नगरसेविका स्नेहा पालकर, माजी नगरसेविका रेखा म्हात्रे उपस्थित राहणार आहेत.
या नागपंचमी उत्सवात श्री. नागदेवतेचे पुजन, पोथी वाचन व आरती,, पारंपारिक नृत्य, फेराची गाणी यासह महिलांच्या विविध स्पर्धा होणार आहेत. नगरसेविका सौ. सुजाताताई पाटील आणि नगरसेविका सौ. जयश्री ठाकूर यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या उत्सवात नेरूळ पश्चिममधील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन कार्यक्रमाच्या आयोजिका सौ. सुजाताताई पाटील यांनी केले आहे.