नवी मुंबई : डासांचा उद्रेक वाढीस लागल्याने साथीच्या आजाराची शक्यता लक्षात घेवून नेरूळ परिसरात औषध व धूर फवारणी करण्याची लेखी मागणी नगरसेविका रूपाली भगत यांनी महापौर जयवंत सुतार, आयुक्त डॉ. रामास्वामी, नेरूळ विभाग अधिकारी व मुख्य वैद्यकीय अधिकार्यांकडे केली आहे.
गेल्या अनेक दिवसापासून नेरुळ परिसरातील सेक्टर १६ ,१६ए, १८, १८ए, २०, २४ आणि २८ भागात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. डासांमुळे परिसरातील नागरिकांना डेंगू,मलेरिया सारख्या रोगाची लागण झाली असून स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे ङ्गप्रशासनाकडून नियमित धूर फवारणी केली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे याबाबत लेखी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यानुसार स्थानिक नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत यांनी नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून डासांमुळे उद्भवणार्या डेंगू,मलेरिया या सारख्या आजारांना आळा घालण्यासाठी नेरुळ परिसरात महापालिका प्रशासनामार्फत युद्ध पातळीवर औषध व धूर फवारणी करण्याची आणि संपूर्ण परिसरात विशेष स्वछता मोहीम राबविण्याची मागणीे लेखी पत्राद्वारे केली आहे.