• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 29, 2018

गडकरींच्या गावातील भाजपचा पराभव ही आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभवाची नांदीः खा. अशोक चव्हाण

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा द्यावाः खा. अशोक चव्हाण

नागपूर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे प्रदेशाध्यक्षांकडून अभिनंदन!

मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे जन्मगाव असलेल्या धापेवाडा (ता. कळमेश्‍वर) ग्रामपंचायतीमध्ये भाजपचा दारूण पराभव करत काँग्रेसने एकहाती विजय मिळविला आहे. भाजपचा हा पराभव आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांतील भाजपाच्या पराभवाची नांदी असून देशातील व राज्यातील जनता पुन्हा काँग्रेसला निवडून देईल असा विश्वास व्यक्त करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी ग्रामपंचायत निवडणुकीतील यशाबद्दल काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. 

यासंदर्भात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, गेल्या साडेचार वर्षात भाजप सरकारने मोठं मोठ्या घोषणा व खोटी आश्वासने देण्यापलिकडे काहीही केले नाही. महागाई रोखण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. इंधनाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. इंधनाचे दर कमी करण्याऐवजी इंधनावर अन्याय्य कर व अधिभार लावून सरकार सर्वसामान्यांची लूट करित आहे. सरकारच्या संरक्षणात उद्योगपती बँकांचे हजारो कोटी रूपये घेऊन परदेशात पळून जात आहेत. शेतक-यांच्या मालाला हमीभाव नाही. तरूणांच्या हाताला रोजगारी नाही. महिला सुरक्षित नाहीत. केंद्र आणि राज्य सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले आहे. जनतेचा भाजप सरकारवर विश्वास राहिला नाही त्यामुळेच नितीन गडकरी यांचे जन्मगाव धापेवाडा आणि गडकरींनी दत्तक घेतलेल्या व पहिली डीजीटल ग्रामपंचायत म्हणून प्रसिद्ध पाचगावातील जनतेने भाजपचा पराभव केला आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दत्तक घेतलेल्या वाराणसीतील गावात व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावातही भाजपचा पराभव करून जनतेने काँग्रेसच्या हाती सत्ता दिली आहे.

गेल्या साडेचार वर्षात देशभरात झालेल्या पोटनिवडणुकीत जनतेने भाजपचा पराभव केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या फुलपूर लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला आहे. महाराष्ट्रातल्या भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातही भाजपचा पराभव झाला. भाजपचा भ्रष्ट आणि धर्मांध चेहरा देशातील जनतेसमोर आला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांत भाजपचा पराभव करून जनता राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार आणेल असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.   

 

Previous Post

नवी मुंबईकरांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका -आमदार संदीप नाईक यांचा महावितरणला इशारा

Next Post

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी शिखर धवन, इशांत शर्माला डच्चू

Next Post
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी  शिखर धवन, इशांत शर्माला डच्चू

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी शिखर धवन, इशांत शर्माला डच्चू

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला तिरंगी झळाळी

विजय साळेच्या पाठपुराव्यामुळे दिशादर्शक फलकांवरील नगरसेवकांची नावे होणार हद्दपार

ऑक्टोबर आला, आता तरी पालिका शाळेतील मुलांना पुस्तके द्या

ऑक्टोबर आला, आता तरी पालिका शाळेतील मुलांना पुस्तके द्या

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com