नवी मुंबई : नेरूळ गावातील काशिबाई कृष्णा म्हात्रे यांचे शनिवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. रविवारी सकाळी १०.३० वाजता नेरूळ गावातील स्मशानभूमीत त्यांच्या अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बेलापुर विधानसभा विद्यार्थीचे अध्यक्ष देवनाथ म्हात्रे यांच्या त्या मातोश्री होत्या. मृत्यूसमयी त्यांचे वय ५३ वर्ष होते. त्यांच्या पश्चात देवनाथ, सोमनाथ, प्रेमनाथ व एक मुलगी, सुना, नातवंड असा विशाल परिवार आहे.
अल्पशा आजारामुळे त्यांना उपचारासाठी वाशीतील फोर्टीज रूग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले. तेथेच त्यांचे निधन झालेे. दोन वर्षापूर्वी देवनाथ म्हात्रे यांच्या वडीलांचे नवरात्रीच्या सुमारास निधन झाले होते. काशिबाई यांच्या निधनाने नेरूळ गावातील म्हात्रे परिवारावर शोककळा पसरली. काशिबाईंना अखेरचा निरोप देण्यासाठी नेरूळ गावातील स्मशानभूमीत नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सागर नाईक, कॉंग्रेसचे प्रदेश सचिव व माजी नगरसेवक संतोष (अण्णा) शेट्टी, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सुरज पाटील, शिवसेना विभागप्रमुख व माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे, नेरूळ गावातील स्थानिक नगरसेवक गिरीश म्हात्रे, शिवसेनेचे गणेश पालवे, तेरणा विद्यालयाचे विजयकुमार नलावडेसर, पत्रकार संदीप खांडगेपाटील, योगेश शेटे यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि देवनाथ म्हात्रेंचा परिवार मोठ्या संख्येने हजर होता. नवी मुंबईकरांच्या वतीने महापौर जयवंत सुतार यांनी श्रध्दाजंली वाहिली.