• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 9, 2018

दिवागावातील अनधिकृत बांधकामावर अतिक्रमण विभागाचा हातोडा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
दिवागावातील अनधिकृत बांधकामावर अतिक्रमण विभागाचा हातोडा

नवी मुंबई : महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या निर्देशानुसार अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामावर आळा घालण्यात येत असून ऐरोली विभागात दिवागाव येथे अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई करण्यात आली.   

ऐरोली विभागांतर्गत दिवागाव, सेक्टर 9 मध्ये घर क्र. 362 येथे श्री. सहदेव मढवी यांच्यामार्फत नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतेही पूर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे तळमजळा + 3 मजल्याच्या  इमारतीचे बांधकाम सुरू होते. या बांधकामास ऐरोली विभाग कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम,  1966 मधील कलम 54 अन्वये रितसर नोटीस बजावण्यात आलेली होती. त्यास अनुसरून श्री. सहदेव मढवी यांनी केलेले अनाधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतू त्यांनी सदर ठिकाणी अनाधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते.

अतिरिक्त आयुक्त शहर श्री. रविंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. अमरीश पटनिगीरे यांचे नियंत्रणानुसार, ऐरोली विभाग कार्यालयामार्फत सहा.आयुक्त श्री. अनंत जाधव व त्यांच्या अधिकारी-कर्मचारी यांनी या अनाधिकृत बांधकामाच्या निष्कासनाची धडक मोहिम हाती घेतली व हे अनाधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी 08 मजूर, 1 गॅस कटर, 2 ब्रेकर तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलिस पथक तैनात होते.   

      नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे बांधकाम करताना महानगरपालिकेच्या संबंधित विभागांची रितसर परवानगी घ्यावी असे आवाहन करतानाच अशाच प्रकारच्या अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणविरोधी कारवाया यापुढील काळातही आणि प्रभावीपणे राबविल्या जाणार आहेत याची नोंद घ्यावी असे नवी मुंबई महानगरपालिकेकडून सूचित करण्यात येत आहे.  

Previous Post

नवी मुंबईतील पालिका रुग्णालयांमध्ये ‘होमिओपॅथी बाहय रुग्ण विभाग‘ सुरु करावा

Next Post

मिस अॅण्ड मिसेसचा शानदार सेमी फायनल सोहळा उत्साहात

Next Post
मिस अॅण्ड मिसेसचा शानदार सेमी फायनल सोहळा उत्साहात

मिस अॅण्ड मिसेसचा शानदार सेमी फायनल सोहळा उत्साहात

टीपीएस योजनेची तातडीने कार्यवाही करा- सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे नैना अधिकार्‍यांना आदेश

टीपीएस योजनेची तातडीने कार्यवाही करा- सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे नैना अधिकार्‍यांना आदेश

‘बेस्ट’ आठवणींचा रिव्हर्स गिअर पडणार, मुंबईची ‘डेबल डेकर’ इतिहासजमा होणार

'बेस्ट' आठवणींचा रिव्हर्स गिअर पडणार, मुंबईची 'डेबल डेकर' इतिहासजमा होणार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com