सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉग्रेसच्या प्रभाग ९६च्या नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत यांच्या वाढदिवसानिमत्त नेरुळ सेक्टर-१६ येथे महानगरपालिकेमार्फत बसविण्यात आलेल्या दिशादर्शक फलकाचे आणि छत्रपती संभाजी राजे उद्यानात LED लाईट व्यवस्थेचा लोकार्पण सोहळा प्रभागातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी मोठ्या संख्येने नागरिक कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते
नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी अंगणवाडीतील मुलांसोबत केक कापून आपला वाढदिवस साजरा केला यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते सदगुरु अंगणवाडीतील मुला/मुलींना कपडे वाटपही करण्यात आले.
प्रभागातील स्थानिक नागरिकांची तसेच प्रभागात येणाऱ्या पाहूण्यांची गैरसोय होत असतानाही दिशादर्शक फलक बसविण्याचे काम गेली १० वर्ष कोणाला जमले नाही, ते काम नगरसेविका रुपाली किस्मत भगत यांनी करून दाखवले त्या बद्दल स्थानिक नागरिकांनी त्यांचे कौतुक केले.
नगरसेविका रुपाली किस्मत भगत निवडून आल्यापासून ते आजपर्यंत प्रभागातील नागरी समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यामुळेच प्रभागात एवढ्या मोठ्या प्रमाणावर विकासकामे होत असल्याचे स्थानिक रहीवाशांना पहावयास मिळत आहेत. कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुका अध्यक्ष गणेशदादा भगत, वसमाजसेविका विमल गांडाल, शुभांगी कलशेट्टी, सुरेखा देठे, प्राजक्ता प्रभू ,रेणुका गिरमाजी, लक्ष्मी महाजन, समाजसेवक संजय पाथरे, आनंदराव पवार, प्रमोद प्रभू ,चंद्रकांत महाजन, दिलीप खांडे, शिवाजी पिंगळे, देवनाथ म्हात्रे, पांडुरंग बेलापूरकर, दत्तात्रय तोंडे, ज्ञानेश्वर इंगवले, गोरक्षनाथ गांडाल, सूर्या पात्रा, विकास तिकोने, चेतन खांडे, धीरज सूर्यवंशी, रवींद्र भगत, दीपक जाधव, सत्यवान घाडी, समाधान कांबळे, मन्सूर कोतवडेकर, रितेश डोके, संजय पिंगळे, प्रवीण पिंगळे, असिफ शेख, सुरज करपे, राजेश घाडी. श्रेयश परशेट्टे, रमेश नार्वेकर, अनंत कदम, सुरेश ठाकूर, रोहन कांबळे, स्वप्नील परंडवाल, मोहन गुजर,अशोक गांडाल, सुभाष यादव, संतोष पावसकर, गणेश काटकर, स्वप्नील सुकाळे, किस्मत भगत, राकेश तांडेल, रोहित चव्हाण, निखिल चव्हाण, सौरव सावंत, गौरव सावंत, तुषार पाटील, चंद्रकांत भगत, मेहबूब कोतवडेकर, भरत कुमार, बाबाजी वाफारे, रामचंद्र शिंदे, अभिमन्यू नारखेडे,आनंद मेश्राम, मनोहर चव्हाण, उत्तम ढसाळ, अशोक गायकवाड, दिलीप जगताप, मोहन कटारे, दिगंबर सूर्यवंशी, श्यामराव पार्टे, पांडुरंग गुरखे, सीताराम पराते, पोपट धुमाळ, उत्तम कांबळे, बी.एम.वाघमारे, तानाजी हांडे, आनंद शेडगे उपस्थित होते.