सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर आठ परिसरातील एल मार्केटच्या कोपऱ्यावर असलेल्या महापालिकेच्या सार्वजनिक शाैचालयातील समस्या सोडविण्याची लेखी मागणी शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
नेरूळ सेक्टर आठ परिसरात एल मार्केटच्या कोपऱ्यावर असलेल्या महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयाला बकालपणा आल असून दुर्गंधीही सुटली आहे. अंर्तगत भागात टाईल्स व शौचकुपाचे भांडेही तुटले आहे. शौचालयालगतच स्टेशन रोड असल्याने येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीमुळे नाकावर रूमाल ठेवूनच ये-जा करावी लागत आहे. महापालिका प्रशासनाने या शौचालयाच्या समस्या सोडवाव्या म्हणून मी सातत्याने संबंधित अिधकाऱ्यांकडे पाठपुरावाही केला असल्याचे नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी निवेदनात म्हटले आहे.