अक्षय काळे
नवी मुंबई : पामबीच मार्गावर सारसोळे जेटीलगत असलेल्या बामणदेव मार्गाच्या रस्त्यावर सारसोळे ग्रामस्थांकडून कोलवाणी माता मित्र मंडळाच्या माध्यमातून मंगळवारी, दि. १२ फेब्रुवारी रोजी राबविण्यात आलेले सफाई अभियान उत्साहात पार पडले. या सफाई अभियानात कांदळवनचे कर्मचारी, महापालिकेचे सफाई कामगार व सारसोळे गावचे युवा ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
बामणदेव हा खाडीअंर्तगत भागात असलेले सारसोळे ग्रामस्थांचे श्रध्दास्थान. खाडीमध्ये मासेमारी करावयास गेल्यावर बामणदेवच आपले रक्षण करतो, अशी सारसोळेच्या ग्रामस्थांची धारणा आहे. बामणदेव हा शंकराचाच अवतार असल्याने गेल्या अनेक वर्षापासून महाशिवरात्रीच्या दिवशी सारसोळेचे ग्रामस्थ गावातील युवकांच्या ‘कोलवाणी माता मित्र मंडळा’च्या माध्यमातून बामणदेव भंडाऱ्याचे आयोजन करत असतात. बामणदेवाची पूजा-उपासना सारसोळेच्या ग्रामस्थांकडून अनेक पिढ्या न पिढ्या करण्यात येत आहे.
दुपारी ३ वाजता पामबीच मार्गापासून सारसोळेच्या ग्रामस्थांनी सुरु केलेले सफाई अभियान सांयकाळी ६ वाजेपर्यत बामणदेवाच्या मंदिरापर्यत चालले. या सफाई अभियानात नवी मुंबई भाजपचे ‘चाणक्य’ समजले जाणारे विजय घाटे, नवी मुंबई महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व प्रभाग ८५च्या नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व नगरसेवक आणि नवी मुंबईच्या राजकारणात कुकशेतचा ढाण्या वाघ समजले जाणारे सुरज पाटील, शिवसेनेचे विभागप्रमुख व शिवसेनेचे माजी महापालिका पक्षप्रतोद रतन नामदेव मांडवे, बेलापुर विधानसभेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते देवा म्हात्रे, समाजसेवक विरेंद्र लगाडे, रवींद्र भगत, राष्ट्रवादीचे पदाधिकारी तुकाराम टाव्हरे, यशवंत तांडेल, पद्माकर मेहेर, शिवसेना शाखाप्रमुख दिलीप आमले, मनोज तांडेल, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबईतील सोशल मिडीयाची तोफ व कडवट गणेश नाईक समर्थक हरिश भोईर, समाजसेवक गणेश पालवे, शरद पाजंरी, अतुल ठाकूर यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील, नवी मुंबई लाईव्ह.कॉमचे संपादक सुजित शिंदे, दिनेशभाई, अखिलभाई, धुरीकाका यांच्यासह सारसोळेचे युवा ग्रामस्थ मोठ्या संख्येने या सफाई अभियानात सहभागी झाले होते.
सफाई अभियानात सहभागी झालेल्यांचे महापालिका ‘ब’ प्रभाग समितीचे सदस्य व कोलवाणी मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर यांनी आभार मानताना ४ मार्च रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी होणाऱ्या बामनदेव भंडाऱ्यातही सर्वांना उत्साहाने, मनोभावे सहभागी होण्याचे आवाहन केले.