अक्षय काळे
- त्रिमूर्ती महिला मंडळाचा उपक्रम
- महिला रिक्षा चालकांचे हळदीकुंकू
नवी मुंबई : नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व त्रिमुर्ती महिला मडंळ च्या संयुक्त विद्यमाने विभागातील सर्व अंबोली रिक्षा महिला चालकांची रस्ता सुरक्षा २०१९ च्या निमित्ताने मंगळवारी, दि. १२ फेब्रुवारी रोजी भव्य रँली काढली. या रॅलीमध्ये नवी मुंबईमधील मोठ्या संख्येने महिला रिक्षा चालक सहभागी झाल्या. सर्व महिलाना रोप देऊन हळदी कुंकूचा कार्यक्रमही यावेळी करण्यात आला. त्रिमुर्ती महिला मडंळाच्या वतीने समाजसेविका सौ. संगिताताई दिलीप आमले यांच्या पुढाकारातून वाशीतील आरटीओ टेस्ट ग्राऊंडवर झालेल्या कार्यक्रमात सर्व महिला यांना झाडाची रोपे देण्यात आली.
या कार्यक्रमात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नवी मुंबई दशरथ वाघुले, मोटार वाहन निरिक्षक भगत, मोटार वाहन निरिक्षक फुंदे, पठान, मेहता, त्रिमूर्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ संगिताताई आमले यांच्यासह मंडळाच्या सदस्या, रिक्षा युनियनचे सदस्य, नवी मुंबईतील अबोल महिला रिक्षा चालक मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमात सुत्रसंचलन शिववाहतूक सेनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दिलिप किसनराव आमले यांनी केले तर आभार प्रर्दशन सौ पाटील यांनी केले.