अक्षय काळे
नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉँग्रेस प्र्रभाग 85 व 86च्या वतीने रविवार, दि. 17 फेब्रुवारी रोजी सांयकाळी 6 वाजता कुकशेत गावात हळदीकुंकू समारंभाचे व नागरी कामाचा शुभारंभ आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी दिली.
कुकशेत गावातील सेक्टर 14 मधील गांवदेवी मैदानावर आयोजित करण्यात आलेेल्या या हळदीकुंकू समारंभास ठाण्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, नवी मुंबईचे विकासपर्व असणारे संदीप नाईक, माजी खासदार संजय पाटील, माजी महापौर सागर नाईक, महापौर जयवंत सुतार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरज पाटील, महापालिका स्थायी समिती सुरेश कुलकर्णी, सभागृह नेेते रवींद्र इथापे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. माधुरी सुतार उपस्थित राहणार आहेेत.
सौ. वैशाली शशिकांत शिंदे, सौ. कल्पना संजीव नाईक, सौ. पल्लवी संजय पाटील, सौ. कल्याणीवहिनी संदीप नाईक, सौ. काजल सागर नाईक, सौ. निर्मला जयवंत सुतार यांची या कार्यक्रमास विशेष उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमात कुकशेत गावातील प्रत्येक घरासमोर गटर, पदपथ व रस्ता रूंदीकरण करणे, कुकशेत गावात घरोघरी महानगर गॅस वाहिनी जोडण्याच्या कामाचा शुभारंभ, पामबीच सर्व्हिस रोड डांबरीकरण करणे आदी कामाचा शुभारंभ नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमामध्ये नेरूळ नोडमधील महिलांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक सुरज बाळाराम पाटील, सौ. सुजाताताई सुरज पाटील व प्रभाग ८६च्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सौ. जयश्री एकनाथ ठाकूर यांनी संयुक्तपणे केले आहे.