नवी मुंबई:- ठाणे लोकसभाचे भाजपा-शिवसेना-आरपीआय महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रचार दौऱ्याचा झंझावात सुरु असून ए.पी.एम.सी. मसाला मार्केट, बेलापूर दिवाळा गाव, सीबीडी पारसिक हिल तसेंच वाशी मिनी सिशोर येथील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या देशाला का गरज आहे? याचे महत्व आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी नागरिकांना पटवून देत भाजपा-शिवसेना महायुतीच्या उमेदवारास निवडून देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. प्रचार दौरा दरम्यान त्यांनी घरोघरी जाऊनही नागरिकांची भेट घेतली व आपणांस पुन्हा नरेंद्रभाई मोदी यांना पंतप्रधान म्हणून पाहायचे असल्याचे सांगितले.
यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, भाजपा-महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ माझ्या बेलापूर मतदारसंघात विविध ठिकाणी प्रचार दौरे सुरु असून आज नागरिकांशी संवाद साधला. आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांची देशाला अत्यंत गरज असून आज फक्त एका योध्यासाठी देशातील सर्व भ्रष्ट विरोधकांचा एकत्र येऊन केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच देशाचे नेतृत्व मिळावे, यासाठी भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार यांना निवडून द्यावे. “आपले एक अमूल्य मत म्हणजे मोदीना मत” असून मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांना जास्तीत जास्त मतदान करून निवडून द्यावे, असे आवाहन आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केले.