स्वयंम न्युज ब्युरो
नवी मुंबई : आज नवी मुंबई मधील आशिया खंडातील सर्वात सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखले जाणारी कृषी बाजार समिती मधील उत्तर भारतीय व्यापारी संघाच्या वतीने आज पुन्हा एकदा विक्रमी मतांनी निवडून आलेल्या खासदार राजन विचारे यांचा जाहीर भव्य नागरी सत्कार समारंभ एपीएमसी मार्केटमध्ये आयोजित केला होता या सत्कार समारंभाला व्यापाऱ्यांनी व्यापार करीत असताना ट्रक मध्ये असलेल्या मालावरून पोलीस बांधवांकडून त्रास होत असल्याची खंत दर्शवली . त्यावेळी खासदारांनी आपल्या भाषणात या बाजार समितीत व्यापाऱ्यांच्या बाजूने उभे राहण्याचे वचन दिले तसेच या बाजार समितीतील व्यापाऱ्यांना पोलिसांकडून काही त्रास होत असल्यास त्यांनी माझ्याशी संपर्क करावा तुमच्या अडचणी मी दूर करेन . खा.विचारे यांनी आपल्या भाषणात या बाजार समितीच्या इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू असे आश्वासन खासदार राजन विचारेंनी उपस्थित असलेल्या व्यापारी वर्गाला दिले. त्यावेळी शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा, उपजिल्हाप्रमुख मिलिंद सूर्यराव, दिलीप घोडेकर, प्रकाश पाटिल,शहरप्रमुख विजय माने, नगरसेवक रामदास पवळे, राजेश शिंदे,उपशहरप्रमुख मनोज इसवे,गणपत शेलार,शेषराव आड़े, शिरीष पाटिल, गणेश पावगे, घनशाम पाटे, व्यपारी महासंघ अध्यक्ष कैलास ताजने,सचिव श्यामराव मोहिते आणि मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय व्यापारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजक रामाशंकर गुप्ता ,मंटु मौर्या, जवाहर गुप्ता,रमेश गुप्ता,अवधेश गुप्ता, सूरज गुप्ता,हीरालाल गुप्ता यांनी खासदार राजन विचारे यांचा सत्कार केला