नवी मुंबई : सारसोळे गावातील, तसेच गावातील अंर्तगत रस्त्यावरील तसेच नेरूळ सेक्टर सहामधील अंर्तगत रस्त्यावरील बंद पडलेले नादुरूस्त पथदिवे तात्काळ दुरूस्त करण्याची लेखी मागणी सारसोळेचे भुमीपुत्र व महापालिका ब प्रभाग समिती सदस्य मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका प्रशासनाकडे केेली आहे.
सारसोळे गावातील ग्रामस्थांना व इतर रहीवाशांंना नागरी सुविधा द्यायच्या नाहीत व नागरी समस्यांचा त्यांना सतत सामना करावा लागावा, असे धोरण महापालिका प्रशासन राबवित असेल तर त्यांच्या भूमिकेविषयी आम्हाला निश्चितच मंत्रालयीन पातळीवर नगरविकास खात्याकडे आणि मा. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्याकडे न्याय मागावा लागेल असा इशाराही मनोज मेहेर यांनी निवेदनातून दिला आहेे.
मागील आठवडाभर सारसोळे गावातील अंर्तगत रस्त्यावर तसेच गावातील अंतर्गत भागात असलेले व नेेरूळ सेक्टर सहामधील अंर्तगत रस्त्यावर पथदिवे बंद आहेत. एकदा तक्रार केल्यावर पथदिव्याची दुरूस्ती झाली, पण ही दुरूस्ती अवघी 24 तासच टिकली. आता पुन्हा पथदिवे बंद पडल्याने सारसोळेच्या ग्रामस्थांना व नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. सध्या पावसाचे दिवस आहेेत. पावसामध्ये अंधाराचा फायदा घेत सारसोळे गावात चोर्यांचे प्रमाण तसेच अंधारामुळे पावसात रस्त्यावर वाटमारीच्या घटना घडण्याची भीती आहे. अंधारामुळे चोरी, लुटमार अथवा अन्य कायदा व सुव्यवस्थेला बाधक ठरणार्या घटना घडल्यास त्यास सर्वस्वी नवी मुंबई महापालिका प्रशासनच जबाबदार राहील याची आपण नोंद घ्यावी. आपण लवकरात लवकर समस्येची पाहणी करून आणि समस्येचे गांभीर्य ओळखून संबंधितांना सारसोळे गावातील व नेरूळ सेक्टर सहा परिसराील अंर्तगत रस्ते, सारसोळे गावातील अंर्तगत भागातील महापालिकेचे दिवे दुरुस्त करून रात्रीच्या वेळी संबंधित परिसरातील अंधाराची समस्या दूर करावी, अशी मागणी मनोज मेहेर यांनी महापालिका प्रशासनाकडे केेली आहे.