नवी मुंबई : मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासन निर्णय क्र. पीआरई-२००९/प्र.क्र.२९५/प्र.शि.
कमला मिल दुर्घटना किंवा सुरत येथील खाजगी क्लासेस मध्ये झालेली दुर्घटना नवी मुंबईतही घडावी याची शिक्षण विभाग व अग्निशामक विभाग वाट पाहत आहे का? नवी मुंबईतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेबाबत महानगरपालिका गंभीर नसल्याचे आरोप मनसे विद्यार्थी सेना नवी मुंबई शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी यावेळी केला तसेच फायर औडीत न करणाऱ्या व अग्निशामक ना हरकत दाखला नसणाऱ्या शाळा महाविद्यालयांची यादी आयुक्तांना सादर केली. अत्यंत गंभीर बाब म्हणजे महानगरपालिकेच्या काही शाळा व विविध कार्यालये यांची सुरक्षा ही राम भरोसे आहे. येत्या सात दिवसात सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या शाळा, महाविद्यालये, खाजगी क्लासेस तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. अन्यथा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसारख्या गंभीर विषयांवर मनसे विद्यार्थी सेनेद्वारे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनविसे तर्फे देण्यात आला.
यावेळी शिष्टमंडळात शहर सचिव – निखील गावडे, उपशहर अध्यक्ष – संदेश डोंगरे, सनप्रीत तुर्मेकर , प्रसाद घोरपडे, विशू सूदाला पदाधिकारी उपस्थित होते.