स्वयंम न्यूज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com
पनवेल : लोणावळा येथील सुनील वॅक्स म्युजियममध्ये श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजीराजे भोसले महाराज यांचे थेट १३ वे वंशज मा.खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांचा मेणाचा पुतळा बनवून स्थापन करण्यात यावा अशी मागणी करणारे निवेदन राजे प्रतिष्ठानच्या मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे जिल्ह्याच्या वतीने रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांच्यामार्फत गुरुवारी देण्यात आले आहे. सुनील वॅक्स म्युजियममध्ये राष्ट्रपुरूषांसह क्रीडा, कला तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचे ८९ पुतळे स्थापन करण्यात आले आहेत. मात्र अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजीराजे भोसले महाराज यांचे थेट १३ वे वंशज मा.खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांचा मेणाचा पुतळा याठिकाणी उपलब्ध नव्हता. ही बाब संस्थेच्या लक्षात आल्यामुळे मा.खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या मेणाच्या पुतळ्याचा समावेश वॅक्स म्युजियममध्ये करून तमाम शिवप्रेमींची इच्छा प्रत्यक्षात अंमलात आणण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी सुनील वॅक्स म्युजियमचे मालक श्री.सुनील यांनी आपण लवकरच पुतळा बनवून तो याठिकाणी म्युझियममध्ये ठेवणार असल्याचे आश्वासन देऊन तमाम पदाधिकाऱ्यांना आनंदाचा धक्का दिला. यावेळी येत्या महिन्याभरामध्ये श्रीमंत छत्रपती खा.उदयनराजे भोसले महाराज यांचा मेणाचा पुतळा याठिकाणी बनवून नागरिकांना तो पाहता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी राजे प्रतीष्ठानचे मुंबई संघटक प्रमुख चंद्रकांत धडके उर्फ मामा, मुंबई अध्यक्ष प्रकाश कोळी, रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक, रायगड जिल्हा अध्यक्ष शिवाजी कराळे, कर्जत खालापूर विधानसभेचे अध्यक्ष निवृत्ती सावंत, उपाध्यक्ष दत्ता पालकर, सचिव प्रकाश तुपे, कार्याध्यक्ष कृष्णा लबडे, पनवेल तालुका अध्यक्ष राज भंडारी, नवी मुंबई अध्यक्ष संदीप बागडे, उपाध्यक्ष अजय साळुंखे, धारावी विधानसभा अध्यक्ष सचिन लोखंडे, विशाल कटके, अशोक पुजारी, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल उम्राटकर, विकी राणे, प्रीतम सुमबे, योगेश दाभाडे, कुमार चौहान, दीपक साने, विकी भाटे, रोहित गोवलकर, प्रवीण जाधव, प्रणित महाडिक, सिद्धेश भांडूगळे आदींसह राजे प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.