स्वयंम न्यूज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : युवासेना सानपाडा विभागातर्फे पॅनकार्ड शिबिराचे आयोजन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने युवासेना सानपाडा विभागातर्फे नागरिकांसाठी पॅनकार्ड शिबीर व मतदार नोंदणी अभियान आयोजित करण्यात आले होते.सदर शिबिरात अत्यंत माफक दरात नागरिकांना पॅनकार्ड काढून देण्यात आले.सानपाडा विभागातील असंख्य नागरिकांतर्फे या संधीचा फायदा घेऊन पॅनकार्डसाठी नोंदणी करण्यात आली,यामध्ये नुकतेच अठरा वर्ष पूर्ण झालेल्या तरुणांचा मोठा सहभाग होता.या शिबिरास शिवसेना उपजिल्हाप्रमुख मिलिंद सुर्यराव,विभागप्रमुख शिरीष पाटील,सुनील गव्हाणे,उपविभाग प्रमुख संदेश चव्हाण,शाखाप्रमुख अजय पवार,अतुल डेरे,विकास मढवी उपस्थित होते. सामान्य नागरिकांची खाजगी एजंट कडून महत्वाची कागदपत्रे काढून घेताना होणारी लूट थांबावी यासाठी युवासेनेतर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे आयोजन युवासेना विभाग अधिकारी आशिष खांडगेपाटील,शाखाअधिकारी सुशील गाडगे,अक्षय हांडे, तसेच स्वप्नील गव्हाणे,निशांत आगलावे,प्रसाद काळे यांच्यातर्फे करण्यात आले होते,या कार्यक्रमात नागरिकांची मतदार नोंदणी संदर्भात जनजागृती व नवीन मतदार नोंदणी करण्यात आल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.